गुन्हे महत्त्वाचे: 1)कल्याण स्टेशन परिसरात चप्पलच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागली असून ते जळून खाक झालं. मात्र, ६ दिवसानी दुकानाची साफसफाई करताना दुकानात एका ११ ते १२ वर्षीय मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहे 2)हडपसर पांढरे मळा येथे राहणारी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला, ही घटना हडपसर येथील अग्रवाल गंगा रेसीडेन्सी या इमारतीच्या ठिकाणी घडली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. 3)शहरातील द्याने परिसरातील एका हिंदू मुलीचे बळजबरीने व बेकायदेशीरपणे धर्मांतर करून मुस्लिम युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या आईने याबाबत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. 4)महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सांगलीत बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका गाडीवर कारवाई केली आहे. 5)मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीतील मुलीच्या वडिलांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. चाकू, एअरगन, चॉपर यासह हत्यारे घेऊन आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुदैवानं या हल्ल्यात मुलगा बचावला आहे.