गुन्हेगारी महत्वाचे : 1) प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये अभिनेता म्हणून दिसणार्या मिराजला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्याला चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले आहे. खरंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा अभिनेता कर्जात बुडाला आणि मग कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारी दुनियेचा मार्ग अवलंबला. 2)उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चहा नाही तयार केला म्हणून पतीने पत्नीला तलाक दिला आहे.महिलेच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेने कोर्टात अर्ज दाखल करून न्याय देण्याची विनंती केली आहे. 3)अमेरिकेत मिसौरी भारतीय अभियंत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय शरीफ रहमान खान असे या तरुणाचे नाव आहे. मैत्रिणीशी असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 4) ऑनलाईन लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात तरुणाने मित्राचीच हत्या केली. मुंबईतील मालाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही बाब उघडकीस नये म्हणून या मित्रानेच १० हजार रुपये देऊन बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले.