गुन्हे महत्त्वाचे: 1)पोटच्या मुलाचाच खून केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील टिळक नगर येथील एका महिलेची शिक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अपिलावर निर्णय देताना रद्दबातल ठरवली. त्यामुळे मागील सात वर्षांहून अधिक काळापासून मुंबईतील भायखळा महिला तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या या महिलेला सुटकेचा दिलासा मिळाला आहे. मात्र, याच हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला तत्कालीन पोलिस अधीक्षक शिवाजी नरवणे याचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावले. 2)एका १७वर्षीय मुलीसमोर जाणीवपूर्वक व लैंगिक हेतूने अश्लिल हावभाव व वर्तन केल्याबद्दल विशेष पोक्सो न्यायालयाने नुकतीच एकाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ‘प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या लैंगिक शोषण नसले तरी आरोपीने केलेली आक्षेपार्ह कृती ही लैंगिक हेतूने केलेली आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्या. एच. सी. शेंडे यांनी व्यवसायाने वाहनचालक असलेल्या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) (अश्लिल लैंगिक हावभाव करत विनयभंग)अन्वये आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. 3)घरात एकट्याच राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील दत्त आळी या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. हंसाबेन ठक्कर असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 4)शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. 5)शनिवारी अंधेरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. मुंबईत हत्या सत्र सुरू असून, गेल्या सहा दिवसांत सहा हत्येची घटनांची नोंद मुंबई पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे.