Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारताने कोविशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, तर लस शोधणाऱ्या ब्रिटनने घटवले! योग्य कोण?

May 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
कोविशिल्ड

मुक्तपीठ टीम

भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले गेले असतानाच ती लस शोधणाऱ्या ब्रिटनमध्ये मात्र ते कमी केले आहे. आता ब्रिटनमध्ये कोविशिल्डचा दुसरा डोस ८ आठवड्यांनंतर घेतला जाईल. भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी तसं करताना ब्रिटनच्या वास्तव माहितीचा हवाला देण्यात आला होता. आता ब्रिटननेच कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील १२ आठवड्याचे अंतर कमी करून ८ आठवड्यांपर्यंत केले आहे. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या कोणाचे अंतर योग्य, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटनुसार, “आज सरकारने कळवले आहे की, कोव्हिड लसीचा दुसरा डोस १२ आठवड्यांऐवजी ८ आठवड्यानंतर दिला जाईल.”

 

Today the government said COVID vaccine second dose appointments will be brought forward from 12 to 8 weeks.

People should continue to attend appointments and don’t need to contact the NHS. Those who should move their appointment forward will be told when they are able to do so.

— NHS England and NHS Improvement (@NHSEngland) May 14, 2021

 

भारतात अंतर नुकतेच वाढवले अंतर

भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसींचा तुटवडा यांच्या दरम्यान एनटीएजीआय या सरकारी तज्ज्ञ समुहाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. पूर्वीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कोविशिल्डच्या दोन डोस दरम्यान सहा ते आठ आठवडे अंतर आवश्यक होते. एनटीएजीआयने असेही म्हटले आहे की, ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल, त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत लस घेऊ नये.

 

अमेरिकन तज्ज्ञाने अंतर वाढवण्यास योग्य म्हटले
व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फॉसी यांनी एका मुलाखतीत पुढील मत व्यक्त केले होते:

• जेव्हा तुम्ही अतिशय कठीण परिस्थितीत असाल, जी परिस्थिती सध्या भारतात आहे, तेव्हा लवकरात लवकर जास्तीत-जास्त लोकांना लसीकरण देण्याचा प्रयत्न करावा लागेल.
• त्यामुळे दोन डोसमधील अंतर वाढवणे हा माझ्या मते हा एक योग्य दृष्टीकोन आहे.
• लसीच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीकोनातून भारत सरकारचे पाऊलही फायदेशीर आहे.

 

ऐकायचे कुणाचे, ज्यांनी लस शोधली त्यांचे की जे वापरत नाही त्यांचे?

  • भारतीय तज्ज्ञ समुहाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस करताना ब्रिटनमधील वास्तव संशोधनाचा दाखला दिला होता. मात्र आता ब्रिटनच्या आरोग्य सेवेनेच अंतर घटवले आहे.
  • अमेरिकन तज्ज्ञांनी जरी दोन डोसमधील अंतर वाढवण्यास योग्य म्हटलं असलं तरी आता ब्रिटननेच ते कमी केल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • कारण कोविशिल्ड या लसीचे संशोधनच ब्रिटनमध्ये झाले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रोजेनेका यांचे ते संयुक्त संशोधन आहे.
  • त्यामुळे जेथे संशोधन झाले त्यांचे ऐकायचे की ज्या अमेरिकेत कोविशिल्ड अद्याप वापरलीच जात नाही, तेथील तज्ज्ञांच्या दुष्टिकोनाला महत्व द्यायचे, असाही मुद्दा चर्चेत आला आहे.

 

कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?

कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?


Tags: कोविशिल्ड लसब्रिटनब्रिटन नॅशनल हेल्थ सर्व्हिसभारतमुक्तपीठ
Previous Post

तौक्ते चक्रीवादळामुळे पाच राज्यांमध्ये अलर्ट, एनडीआरएफची ५३ पथके सज्ज

Next Post

कोरोनाचा संकट काळ, पण सोन्याच्या भारतातील आयातीत विक्रमी वाढ

Next Post
gold

कोरोनाचा संकट काळ, पण सोन्याच्या भारतातील आयातीत विक्रमी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!