मुक्तपीठ टीम
भारतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन मंजुरी मिळाली. तर मंगळवार, १२ जानेवारीला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड ही लस देशातील १३ देशांमध्ये वितरणासाठी पाठविण्यात आली. मात्र, त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली. ती चर्चा म्हणजे, या दोन लस पैकी कोणती लस घ्यायाची. मात्र, लसचा लाभ घेणाऱ्यांना दोन लसमध्ये निवड करण्याचा पर्याय नसेल, असे आरोग्यमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“जगातील अनेक देशांमध्ये एकापेक्षा जास्त लस वापरल्या जात आहेत. या देशांतील कोणत्याही लाभार्थींना असा पर्याय उपलब्ध नाही,” असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे. देशातील कोरोना लसीकरण ऐच्छिक आहे परंतु आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कार्मचाऱ्यांना असा पर्याय आहे की नाही हे मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून स्पष्ट होईल.
डोसच्या नमुन्यांची रूपरेषा सांगताना आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असेल, तर दुसर्या डोसच्या १४ दिवसानंतर लसचा प्रभाव दिसण्यास सुरूवात होईल. एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल आणि भूषण यांनी लसीकरणानंतरही सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारताला मंजूर झालेल्या दोन लस सर्वात सुरक्षित आहेत, यात शंका नाही. या लस वापरात आणण्या अगोदर हजारो लोकांवर चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे दुष्परिणामाचा कोणताही धोका नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे.