मुक्तपीठ टीम
तुम्हाला जर कुत्रा, मांजर हे प्राणी आडतील असतील तुम्ही नक्कीच काळजी घेतली पाहिजे. कारण आता कोरोना फक्त मनुष्यासाठीच नाही तर त्यांच्या सभोतालच्या पाळीव प्राण्यासाठीही गंभीर समस्या बनण्याची भीती आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णांमुळेही प्राण्यांना कोरोना होऊ शकतो. यात घरात असणाऱ्या कृत्रे, मांजरांच्या व्यतिरिक्त वन्य प्राण्यांचा समावेश आहे.
आयव्हीआरआयच्या संशोधकांनी यासंदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी विशेषत: घरात राहणाऱ्या प्राण्यासंबंधीत सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध माहितीनुसार, कोरोना संसर्ग प्राण्यांपासून मनुष्यामध्ये पसरण्याची शक्यता मात्र फारच कमी आहे.
प्राण्यांना संसर्गापासून कसे वाचवाल?
• सर्वप्रथम प्राण्यांना संसर्गापासून वाचविण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त घरातच ठेवा, बाहेर जाऊ देऊ नका.
• बाहेर गेल्यास लोकांपासून कमीत कमी ६ फूट दूर ठेवा.
• गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांना घेऊन जाणे टाळा.
• संसर्गाच्या भीतीने प्राण्यांना मास्क किंवा सॅनिटायझर लावू नका, कारण त्यामुळे प्राण्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल.
• प्राणी कोरोना संसर्गित तर नाही आहे ना? हे जाणून घेण्यासाठी आयव्हीआरआयमधील सेंटर फॉक अॅनिमल डिसीज रिसर्च अॅन्ड डायग्नोसिस सारख्या केंद्रांशी संपर्क साधा.
• जर चाचणीनंतर प्राणी कोरोना बाधित आढळल्यास घरातील अन्य प्राणी आणि सदस्यांपासून त्याला दूर ठेवा.
• तसेच प्राण्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात, त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार करण्यावर प्राधान्य द्या.