मुक्तपीठ टीम
आपल्या कुटुंबापासून दूर राहून कोरोना संकट काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनायोद्धा विशेष पदकानं गौरवले जाण्याची शक्यता आहे. अशा पोलिसांना गौरवण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.
पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पोलिसांच्या कोरोना संकट काळातील कर्तृत्वाची प्रशंसा केली आहे. “कोरोना काळात पोलिसांची कामगिरी ही वाखाणण्याजोगी होती. याआधी तामिळनाडूसारख्या इतर काही राज्यांमध्ये कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोना योद्धे म्हणून पदक देण्यात आले आहे.
कोरोनामुळे शहीद झालेल्या तसेच गेल्या दोन वर्षात पोलीस सेवेत असताना मृत्यू पावलेल्या ७४ पोलीस पाल्यांना पोलीस सेवेत नियुक्तीचे पत्र देण्यात आलीत. ठाण्यातील साकेत येथील कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना नगराळे यांनी या विशेष पदकाबाबतची इच्छा व्यक्त केली.