मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १ जानेवारी पासून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळालेला असून लवकरच देशात सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे. अस असताना मात्र दुसरीकडे ७७ टक्के कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये कोरोना लसीकरणाविषयी शंका असल्याने त्यांनी लसीकरणाला नकार दिला आहे. कर्करोगग्रस्त दुष्परिणामांच्या भीतीमुळे लसीकरणास नकार देत असल्याचा अहवाल टाटा मेमोरियल रुग्णालयाने मांडला आहे.
सर्वेक्षणातून काय निष्पन्न झाले?
- हे सर्वेक्षण ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ४३५ रुग्णांवर करण्यात आले आहे.
- यापैकी, ८०% रुग्णांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, १५.२ % रुग्णांना पहिला डोस मिळाला होता आणि फक्त ४.८% रुग्णांना दोन्ही डोस मिळाले होते.
- तर ७७% सर्वेक्षण केलेल्या रुग्णांमध्ये लसीबाबत सांशकता दिसून आली.
- सांशकतेचे एक कारण म्हणजे दुष्परिणामांची भीती आणि कर्करोगाच्या उपचारांचा परिणाम (३८%) आणि माहितीचा अभाव (२६.७%).
- तसेच कोरोना लसीबाबत मार्गदर्शन आणि पूर्व सल्ल्याचा अभाव या संकोचात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
- डॉ श्रीपाद बनवली यांनी स्पष्ट केले की कोरोना लसीकरण केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमध्ये व्यत्यय आणत नाही.
- कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोरोना लसीचे कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम नाहीत.
- डॉ पंकज चतुर्वेदी, यांनी स्पष्ट केले की, लसीसंबंधित शंका कोरोना लसीकरण कार्यक्रमांमध्ये अडथळे आणत आहे.
कर्करोग आणि कोरोना लसीकरण
- केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेत असलेल्या कर्करोगग्रस्त रुग्ण कोरोना लस घेऊ शकतात.
- लस कर्करोगाच्या उपचारात अडथळा आणत नाही किंवा कोणतेही अतिरिक्त दुष्परिणाम नाही.
- कर्करोगग्रस्त रुग्ण असुरक्षित वर्गात येतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे.