अजिंक्य घोंगडे
देशामध्ये १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणास सुरूवात झाली. तर अद्याप कुठेही या लसीकरणानंतर लाभार्थीना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. नांदेड जिल्ह्यातही लसीकरण पार पडले. या लसीकरणाचा पहिला मान मिळणारे नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी आपला अनुभव www.muktpeeth.comसोबत मोकळेपणाने मांडला आहे.
नांदेड जिल्ह्यातही निळकंठ भोसीकर यांना पहिल्यांदा लस देण्यात आली. “७२ तास उलटून गेल्यानंतरही कसलाही ञास झालेला नाही. त्यामुळे ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. एखाद्याला मळमळ होण्यासारखा सौम्य त्रास होऊ शकतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही”. सर्वांनी लसीकरणासाठी तयार राहणे आवश्यक आहे.
पाहा व्हिडीओ:
नांदेड जिल्हा प्रशासन सरकारने दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे लसीकरणासाठी काम करत आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे.