मुक्तपीठ टीम
सर्वाधिक लसीकरणाच्या आकडेवारीत जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारताचा क्रमांक आहे. १८ फेब्रुवारी २०२१ ला सकाळी ८ वाजेपर्यंत ९४ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कोरोना लसीकरण अभियानांतर्गत लस घेतली.
गुरुवारी सकाळी ८ वाजता आलेल्या अहवालानुसार आतापर्यंत १,९९,३०५ सत्रात ९४,२२,२२८ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये ६१,९६,६४१ आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा) ३,६९,१६७ आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि २८,५६,४२० आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा (पहिली मात्रा) समावेश आहे.
कोरोना लसीकरणाची दुसरी मात्रा १३ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु झाली, पहिली मात्रा घेऊन २८ दिवस झालेल्यांना ही दुसरी मात्रा देण्यात येत आहे. २ फेब्रुवारी २०२१ पासून आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले.
पाहा व्हिडीओ: