मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईचीही हीच भीषण स्थिती आहे. सध्या दुसरी लाटेची स्थिती मंदावत असतानाच देश तिसऱ्या लाटेबाबत भीती व्यक्त करत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा त्यांच्या शहरावर फारसा परिणाम होणार नाही, असे मुंबई पालिकेला वाटते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे.
मनपाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शहरावर मोठा परिणाम होईल असे वाटत नाही. मुंबई मनपाने आपल्या लसीकरण मोहिमेच्या आधारे हा अंदाज दिला आहे. मुंबईत आतापर्यंत 42 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 82 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.
‘कोरोना महामारी थांबवण्यासाठी काम सुरू आहे. ते सुरूच राहील. आता लसींची कमतरता नाही. मुंबई सुरक्षित आहे. कोरानाची तिसरी लाट येत आहे असे आम्हाला वाटत नाही. असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वकील अनिल साखरे उच्च न्यायालयात म्हणाले.” ते असेही म्हणाले की, “आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस 2 हजार 586 अशा लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत जे अंथरुणावर खिळलेले आहेत. त्याचबरोबर 3 हजार 942 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, शारीरिकदृष्ट्या अपंग लोक जे लसीकरण केंद्राला भेट देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करत होते, त्या दरम्यान युक्तिवाद झाला. या वर्षी वकील धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी हा अर्ज दाखल केला होता.