मुक्तपीठ टीम
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या BA.5 ने एन्ट्री घेतली आहे. यापूर्वी इन्साकोगने देशात BA.4 ची पुष्टी केली होती. देशातील या सबव्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळलला आहे, तर दुसरे प्रकरण तेलंगणामध्ये आढळून आले आहे.
इंडियन SARS-CoV-2 सिक्वेन्सिंग असोसिएशन (INSACOG) ने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, तामिळनाडूमधील एका महिलेला BA.4 या विषाणूच्या सब व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. निवेदनानुसार, महिलेला सौम्य लक्षणे आहेत आणि तिने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि कुठेही प्रवास केलेला नाही.
तेलंगणातील एका ८० वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाचा सब व्हेरिएंट BA.5 ची पुष्टी झाली आहे. वृद्ध व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि कोठेही प्रवास केलेला नाही. हे या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतून प्रथम नोंदवले गेले होते आणि आता इतर अनेक देशांमधून नोंदवले जात आहेत.
ओमायक्रॉनचे दोन सब व्हेरिएंट, BA.4 आणि BA.5, जागतिक स्तरावर पसरत आहेत. या दोन्ही सब व्हेरिएंटचे प्रकरण या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नोंदवली गेली होती आणि आता इतर अनेक देशांमध्ये याची पुष्टी केली जात आहे.
गेल्या २४ तासात राज्यात ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३३,०४३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१०% एवढे झाले आहे.
- गेल्या २४ तासात राज्यात एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे.