मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या हाहाकरामुळे जगभरातील जवळपास सर्वच देश हतबल झाले आहे. या महामारीत आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कोट्यावधी लोक संक्रमित झाले आहेत. याच दरम्यान, कोरोना विषाणूसंदर्भात मेडिकल जर्नल लॅन्सेटने एक धक्कादायक दावा केला आहे. कोरोनाचा विषाणू हवेतून पसरत असून याचे ठोस पुरावेही असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाच्या ६ तज्ज्ञांनी हा अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार, मनुष्यामध्ये कोरोनाचा संक्रमण होण्यासाठी एसएआर-सीओव्ही-२ हा विषाणू कारणीभूत आहे. सातत्याने मास्क आणि सामाजिक अंतर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत असणाऱ्या काही लोक विषाणूच्या संसर्गाचे बळी पडत आहेत. उत्तम प्रकारची आरोग्य सुविधा असतानाही कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश येत आहे, कारण हा विषाणू हवेत असल्याने तो एका मनुष्यातून दुसऱ्या मनुष्यात सहज पसरतो आहे.
“Ten streams of evidence collectively support the hypothesis that #SARS-CoV-2 is transmitted primarily by the airborne route.”
New Comment from @trishgreenhalgh, @kprather88, @jljcolorado, @zeynep, @dfisman, and Robert Schooley. #COVID19 https://t.co/2z8jLEcOPH
— The Lancet (@TheLancet) April 16, 2021
संसर्गाला रोखण्यासाठी सावधानगिरी बाळगणे गरजेचे
दरम्यान, या संशोधनात सहभागी झालेल्या एका तज्ज्ञानी म्हटले की, “जागतिक आरोग्य संघटना आणि सार्वजनिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या इतर एजन्सींच्या वैज्ञानिकांनी हवेमार्फत विषाणू पसरत असल्याचे पुरावे स्वीकारले पाहिजेत. जेणेकरुन हे रोखण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. तसेच हवेतून होणाऱ्या संसर्गापासून सावधानगिरी बाळगली नाही तर हे याला रोखणे कठिण होईल”.
तसेच या अहवालातून हे ही समोर आले आहे की, कोणतेही लक्षण नसणारेही हा विषाणू पसवत आहेत. संसर्ग पसवण्यामध्ये या लोकांचा ४० टक्के हिस्सा आहे. त्यामुळे हवेद्वारे विषाणू परसत असणाऱ्या पुराव्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हवेतून कोरोना संसर्गाचा दावा कशाच्या आधारावर?
• कोरोना विषाणूंचा प्रसार हा Droplets म्हणजेच थेंबापेक्षा Aerosol म्हणजेच हवेतील सुक्ष्म कणांमधून होणे जास्त शक्य आहे.
• हॉटेलमध्ये राहणारे लोक हे आजूबाजूला असलेल्या वेगळ्या खोल्यांमध्ये राहत होते. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. खरंतर ते कधीही एकमेकांच्या खोल्यांमध्ये गेलेले नव्हते.
• खोकला किंवा शिंका अन्य लक्षणे नसलेले लक्षणविरहित कोरोना रुग्ण ३३ ते ५९ टक्के कोरोना संसर्ग प्रसारासाठी जबाबदार असतात.
• कोरोना विषाणूचा संसर्ग हा बाहेरच्या मोकळ्या जागेपेक्षा बंद जागेत होण्याची शक्यता जास्त असते. बंद भागात व्हेंटिलेशन तेवढे चांगले असेलच असे नाही.
• तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू हवेत आढळला आहे. एका प्रयोगशाळेत हा विषाणू हवेत कमीतकमी ३ तास संसर्गजन्य स्थितीत आढळला. तसेच कोरोना रूग्णांच्या खोली आणि कारमधील हवेच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू आढळला.
• कोरोना विषाणू हे रुग्णालयातील एअर फिल्टर्स आणि बिल्डिंग डक्टमध्ये आढळतात. हे विषाणू त्या ठिकाणी केवळ हवेद्वारेच पोहोचू शकतो.
• कोरोना विषाणू हवेद्वारे पसरत नाही, हे अद्याप पुराव्यांनिशी सिद्ध होऊ शकले नाही.
हवेतून संसर्ग रोखण्यासाठी काय कराल?
• हवेतून संसर्ग रोखण्यासाठी व्हेंटिलेशन आणि एअर फिल्ट्रेशन गरजेचे आहे.
• तसेच गर्दीत जाणे टाळणे, कमीतकमी वेळ बंद जागेत घालवा किंवा आपल्या खोलीत इतर कोणालाही येऊ देऊ नका.
• घरातही मास्क घाला. चांगल्या गुणवत्तेचा मास्क परिधान करा.
• तसेच भेटणे आवश्यकच असेल तर उच्च प्रतीचा पीपीई किट परिधान करूनच कोरोना बाधितांना भेटा.
• जर या संशोधनाला मान्यता मिळाली तर घरातही मास्क लावावे लागतील. तसेच कोरोना सुरक्षा नियमावलीत महत्वाच्या बदलांची शक्यता आहे.