मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट मंदावू लागली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु बिहार, हरियाणा, हिमाचलसह अनेक राज्यांनी सरकारची चिंता वाढविली आहे.
महाराष्ट्रात मोठा दिलासा
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत चालले आहे. मुंबई मनपाच्या क्षेत्रात १२हजारापर्यंत गेलेली रोजची नवी रुग्णसंख्या सोमवारी अवघ्या २६००वर आली. ती खालीच जाताना दिसत आहे.
कोरोना कमी होणारे जिल्हे
- मुंबई
- ठाणे
- औरंगाबाद
- धुळे
- भंडारा
- गोंदिया
- जळगाव
- लातूर
- नांदेड
- नंदुरबार
- वाशिम
कोरोनाची गती कमी होत असलेली राज्यं
- महाराष्ट्र
- छत्तीसगड
- दिल्ली
- गुजरात
- झारखंड
- लडाख
- लक्षद्वीप
- मध्य प्रदेश
- पंजाब
- तेलंगणा
- उत्तर प्रदेश
- उत्तराखंड
- दमण आणि दीव
या राज्यांमध्ये दररोज कोरोनाच्या प्रकरणात घट होताना दिसत आहे.
या राज्यांची चिंता वाढली…
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, एका बाजूला काही राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट होत आहे तर काही इतर राज्यांत दररोज नवनवीन रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
- बिहार
- आसाम
- अंदमान-निकोबार
- आंध्र प्रदेश
- गोवा
- चंदीगड
- हरियाणा
- अरुणाचल प्रदेश
- हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर
- कर्नाटक
- केरळ
- मणिपूर
- मेघालय
- मिझोरम
- नागालँड
- ओडिशा
- पुद्दुचेरी
- राजस्थान
- सिक्कीम
- तमिळनाडू
- त्रिपुरा
- बंगाल
कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढतेय
- २ मे रोजी हे प्रमाण ७८ टक्के होते
- ३ मे रोजी ते अंदाजे ८२ टक्के होते.