मुक्तपीठ टीम
देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या महामारीमुळे भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राला गेल्या वर्षी अत्यंत वाईट टप्प्यातून जावे लागले होते. आता कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेनंतर रिअल इस्टेट व्यवसाय पुन्हा सावरू लागेल. त्यात ग्राहकांकडून होणारी चौकशी चांगले संकेत देणारे असल्याचे मत रिअल इस्टेट सेक्टरमधील जाणकार व्यक्त करतात. आता लोक कॉम्पॅक्ट घरांची मागणी करीत नाहीत, तर मोठ्या घरांबद्दल चौकशी जास्त होत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे बांधकाम कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे, परंतु सर्वच ठप्प झाले असे नाही. सध्या टाटा रियल्टी देशातील १५ शहरांमध्ये १७ निवासी व ३ व्यावसायिक प्रकल्पांवर काम करीत आहेत. त्यामध्ये सुमारे ३००० कामगार कार्यरत आहेत. गेल्या वर्षीच्या कोरोना संकटाला पाहता, कंपनीने सर्व कामगारांना जागेवर राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच टाटा रियल्टीचा फिजिकल सेल्स बंद असला तरी ऑनलाईन विक्री सुरु आहे. या कंपनीप्रमाणेच इतरही कंपन्यांची कामे सुरु आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रात नव्या ट्रेंडबाबत जाणकार काय सांगतात?
• निवासी प्रकल्पातही आता वेलनेस फॅक्टरची गरज भासू लागली आहे.
• आता लोक कॉम्पॅक्ट घरांची मागणी करीत नाहीत, तर मोठ्या घरांबद्दल चौकशी जास्त होत आहे.
• छोट्या घरांची मागणी आता मर्यादित राहण्याची अपेक्षा आहे.
• गेल्या काही वर्षात प्रत्येक रिअल्टी कंपनीने कॉम्पॅक्ट घरे बांधायला सुरुवात केली होती.
• आता रिअल इस्टेट व्यवसायात कॉम्पॅक्ट घरांसाठी आता मर्यादित मागणी असेल, मोठ्या घरांवर भर असेल.
पाहा व्हिडीओ: