मुक्तपीठ टीम
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. धारावीत रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर आतापर्यंत सातवेळा धारावीची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. मुंबई मनपाच्या योगदानामुळे आणि धारावीकरांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधातील दिलेला लढा यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे.
धारावी रुग्णसंख्या कधी कधी शून्यावर?
- २५ डिसेंबर २०२०
- २२ जानेवारी २०२१
- २६ जानेवारी २०२१
- २७ जानेवारी २०२१
- ३१ जानेवारी २०२१
- २ फेब्रुवारी २०२१
- १४ जून २०२१
मनपा आणि धारावीकरांनी करुन दाखवलं : महापौर
- दरम्यान, याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “हे मुंबई मनपाचं यश आहे. याबद्दल धारावीकरांचं स्वागत करायला हवं आहे. ७ वेळा धारावी शून्यावर आली आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलं. त्याला लोकांनी योग्य प्रतिसाद दिला. धारावी शून्यावर आली तरी पुढे नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. धारावीकर आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखवलं आहे”
- गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी कोरोनाचा हॉटस्पोट ठरला होता.
- मात्र, मिशन झिरो, माझे कुटुंब माझी जबाबदारी यासह मनपाच्या योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधात दिलेला लढा यशस्वी ठरत आहे.
- मात्र, कोरोनाच्या दुसरी लाट गेल्या वर्षी पेक्षाही जास्त भयानक ठरली.
- मात्र दुसऱ्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला नाही.