मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू मंदावतेय, परंतु कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना लक्ष्य करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मनपा त्यासाठी जय्यत तयारी करत आहे. त्याचा एक भाग म्हणून नियमितपणे सेरो सर्वेक्षण केले जाते. चौथ्या सर्वेक्षणात मुंबईतील ५०% मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळले आहे.
सोमवारी आलेल्या मनपाच्या चौथ्या सेरो सर्वेक्षणाच्या अहवालात हे उघड झाले आहे. या अहवालानुसार ज्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत त्यांना याआधी कोरोना संसर्ग होऊन गेला असावा. तज्ज्ञांच्या मते, यामुळेही दिलासा मिळाला आहे. अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे, तिसऱ्या लाटात या मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे. सर्वेक्षणानुसार, १० ते १४ वर्षे वयोगटातील ५३.४३% लहान मुलांना संसर्ग झाला आहे.
कसं झालं सेरो सर्वेक्षण?
- चौथ्या सेरो सर्वेक्षणात मुंबईतील २४ वार्डांमधील २,१७६ लहान मुलांचे घेतले नमुने घेण्यात आले.
- कस्तुरबा मॉल्यूक्युलर डायग्नोस्टिक लॅबोरेटरी आणि बीएलवाय नायर हॉस्पिटलद्वारे सर्वेक्षण करण्यात आले.
- हे सीरो सर्वेक्षण १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान करण्यात आले.
- या सर्वेक्षणात असे दिसून आले की पूर्वीच्या तुलनेत मुलांमध्ये अॅटीबॉडीज वाढले आहेत.
- सर्वेक्षण करण्यासाठी, नमुने १-४, ५-९, १०-१४ आणि १५ ते १८ वयोगटात विभागले गेले.
- सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की १० ते १४ वर्षे वयोगटातील ५३.४३% मुलांना सर्वात जास्त संसर्ग झाला आहे.
- सीरो सर्वेक्षणात एकूण ५१.१८ टक्के पॉझिटीव्हिटी रेट आढळून आला आहे.
सर्वेक्षणात उघड झालेली महत्वाची माहिती
- ५०% मुलांमध्ये अँटीबॉडी आढळल्या.
- ५१% पॉझिटीव्हिटी रेट आढळून आला.
- १० ते १४ मुलांना सर्वात जास्त ५३.४३ टक्के संसर्ग झाला आहे.
- १ ते ४ वर्षे वयोगटातील ५१.०४% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत.
- ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये हा आकडा ४७.३३% होता.
- १५ ते १८ वर्षे वयोगटातील ५१.३९% आढळले आहेत.
- १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ५१.१८% सेरो पॉझिटिव्हिटी आढळला आहे.
- तिसर्या सेरो सर्वेक्षणात १८ वर्षाखालील ३९.४% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले.
सेरो सर्वेक्षण म्हणजे काय?
- सेरोलॉजी चाचणी करून सेरो सर्वेक्षण केले जाते.
- यात रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जाते.
- एखाद्या विशिष्ट संसर्गाविरूद्ध बनविलेल्या अँटीबॉडीजची चाचणी केली जाते.
- जेव्हा जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्या विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज तयार करते.
- हे अँटीबॉडीज तुमच्या रक्तात सुमारे एक महिना राहतात.