Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच दिवसात कोरोना रोखणारी गोळी! अमेरिकन कंपनीचा दावा

March 18, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
corona pill

मुक्तपीठ टीम

संपूर्ण जगात कोरोना लसीकरण मोहिम सुरू असताना आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोरोनावर गोळी तयार केल्याचा दावा केला आहे. या गोळीमुळे कोरोना विषाणूंच्या वाढीवर पाच दिवसात परिणाम होत असल्याचाही दावा ती गोळी शोधणाऱ्या कंपनीने केला आहे. जर ही गोळी चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली तर कोरोनाविरोधातील लढाईत खूप प्रभावी शस्त्र माणसांच्या हाती येईल.

नव्या गोळीच्या प्राथमिक चाचण्यांमधून तिच्यामुळे विषाणूंची संख्या घटते हे दिसून आले आहे. पाच दिवस गोळीद्वारे चाललेल्या उपचारांमध्ये, रूग्णात कोरोना विषाणूंची वाढ रोखल्याचे दिसले. अमेरिकन कंपनी रिजबॅक बायोथेरप्यूटिक्सने आत्तापर्यंत केलेल्या प्राथमिक चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले. जर ही गोळी चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली तर कोरोनाविरूद्धची ही पहिली ओरल अँटीव्हायरल गोळी असेल.

 

कोरोना विषाणूंची वाढ रोखते
कंपनीचे सह-संस्थापक वेन होलमन यांनी दावा केला आहे की, आतापर्यंतच्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, नवीन गोळी कोरोना विषाणूंची वाढ रोखते. त्यामुळे हे औषध कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी सिद्ध होऊ शकते. तथापि, आत्तापर्यंत केलेल्या संशोधनातून तसा दावा १०० टक्के सिद्ध होत नाही. त्यामुळे पुढील संशोधन होणे बाकी आहे.

 

कोरोना गोळी कशी वेगळी?

  • कोरोनाविरूद्ध तयार केलेल्या सध्याच्या लसी त्याच्या स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करतात आणि संसर्ग वाढण्यास प्रतिबंध करतात.
    अमेरिकन ड्रग कंपनीचे हे नवीन औषध कोरोनाच्या त्या भागावर हल्ला करते, ज्यामुळे शरीरात त्याची संख्या वाढते.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार मार्चच्या अखेरीस या संशोधनाचे सविस्तर निष्कर्ष येतील.
  • मॉल्नुपीरवीर औषध कोरोना रोखण्यात कितपत यशस्वी आहे हे समजेल. तसेच मृत्यूचे प्रमाण किती कमी होते, तेही स्पष्ट होईल.

Tags: antiaviral table-coronaबायोथेरप्यूटिक्समॉल्नुपीरवीर औषधवेन होलमन
Previous Post

#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

#अध्यात्म विश्वची माझे घर

Next Post
adhyatm

#अध्यात्म विश्वची माझे घर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!