मुक्तपीठ टीम
लासर्न अँड टुब्रोच्या अवजड अभियांत्रिकी विभागाने नॉर्थ अमेरिकेतील सर्वात बलाढ्य परिवर्तनीय डिझेल उत्पादक डायमंड ग्रीन डिझेल (डीजीडी) ला परिवर्तनीय डिझेल प्रकल्पासाठीच्या पाच अत्यंत महत्वपूर्ण भट्ट्या (रिअॅक्टर्स) पाठवल्या. विशेष म्हणजे करारानुसार निर्धारित करण्यात आलेल्या वेळेच्या तब्बल दोन आठवडे आधीच या भट्ट्या पाठवून देण्याची कामगिरी ‘एल अँड टी’ने करून दाखविली आहे.
डीजीडी ही टेक्सास, अमेरिका येथील डार्लिंग इन्ग्रेडीयंट्स इंक. आणि व्हॅलेरो एनर्जी कॉर्पोरेशन यांच्यातील साहसवित्त करार कंपनी आहे. ‘एल अँड टी’ आपल्या युनायटेड स्टेट्समधील आणि युरोपीयन ग्राहकांसाठी अशा आणखी तीन हरित डिझेल प्रकल्पांची पूर्तता आगामी काळात करणार आहे. गुजरातमधील हाजिरा येथे प्रस्थापित लासर्न अँड टुब्रोच्या संपूर्ण समन्वित, अद्ययावत आणि डिजिटल सक्षम अशा अवजड अभियांत्रिकी संकुलामार्फत ही कामगिरी केली जाणार आहे.
‘एल अँड टी’द्वारा उत्पादित भट्ट्यांमध्ये फेरवापर केलेली प्राणीजन्य चरबी, पुनःपुन्हा वापरलेले स्वयंपाकाचे तेल आणि खाद्य मका तेल अशा जैविक घटकांवर (बायोमास) प्रक्रिया करून त्याद्वारे हरित डीझेलची निर्मिती केली जाते. परिवर्तनीय डिझेलचा उपयोग सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये सहजतेने करता येतो, त्यासाठी कुठलेही बदल वा फेरफार करावे लागत नाहीत. याच्या वापरामुळे पारंपरिक डिझेल इंधनाच्या तुलनेत हरित वायू उत्सर्जनाचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य होते.
‘एल अँड टी’च्या कार्यकारी समितीचे सभासद, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अवजड अभियांत्रिकीचे प्रमुख श्री. अनिल परब म्हणाले, “एवढ्या महत्वाच्या भट्ट्यांकरीता ‘एल अँड टी’वर भरवसा दाखवून आम्हाला पुरवठ्याची संधी दिल्याबद्दल मी ‘डीजीडी’चे आभार मानू इच्छितो. या प्रकल्पाची जलदगतीने पूर्तता करण्याच्या काळातच भारताला कोविड १९च्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका बसलेला होता. ऑक्सिजन व अन्य औद्योगिक वायुंचा पुरवठा तब्बल ४५ दिवसांसाठी पूर्णपणे ठप्प झालेला होता. या परिस्थितीने आमच्या संयम आणि सहनशक्तीची पूर्णत: परीक्षा पहिली. या सर्व समस्यांना तोंड देताना देखील ग्राहकांना विनाखंडित सुरळीत सेवा पुरविण्याचे आणि कंत्राटाची वेळेत पूर्तता करण्यासाठीच्या आमच्या विश्वासार्हतेचे अजोड ट्रॅक रेकॉर्ड आम्ही कायम राखले.”
अतिशय अवघड आणि महत्वपूर्ण अशा या तंत्रज्ञानामुळे नवीन संधी खुल्या होतील आणि ग्राहकांना कार्बन उत्सर्जनाला अटकाव करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सहाय्य मिळेल. अशा प्रकारच्या परिवर्तनीय ऊर्जा प्रकल्पांची यशस्वी पूर्तता करणे हा कंपनीच्या पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) चौकटीच्या देखरेखीखाली आपला हरित व्यवसाय पोर्टफ़ोलिओ वाढविण्याच्या ‘एल अँड टी’च्या व्यावसायिक धोरणाचा एक भाग आहे.
‘व्हॅलेरो’चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. जॉन रोश म्हणाले, “अतिशय अवघड आणि किचकट अशा या भट्ट्यांचे उत्पादन करताना, त्यांच्या सर्वोच्च सुरक्षेची, गुणवत्तेची व विश्वासार्हतेच्या गरजांची दक्षता घेताना आणि त्याचवेळी त्यांची वेळेच्या आधीच पूर्तता करताना ‘एल अँड टी’ने दाखविलेल्या परिणामकारक आणि कार्यपूर्ती दृष्टीकोनामुळे आम्ही अतिशय उत्साहित झालेलो आहोत. डीजीडी #३ या प्रकल्पाच्या दृष्टीने हे एक सर्वाधिक कळीचे असे कंत्राट होते आणि कोविड१९ च्या आव्हानांचा सामना कारावा लागून देखील ‘एल अँड टी’ने आपले आश्वासन पूर्ण करून दाखवले. आम्ही आगामी काळातील महत्वपूर्ण प्रकल्पांसाठी एक मोलाचा पुरवठादार आणि स्त्रोत म्हणून ‘एल अँड टी’कडे बघत आहोत.”
‘एल अँड टी’चे ए.एम. नाईक अवजड अभियांत्रिकी संकुल, हाजिरा (सुरत) ही जागतिक दर्जाचे, अद्ययावत, संपूर्ण समन्वित, डिजिटली सक्षम अशी उत्पादन सुविधा आहे. मेक इन इंडिया मोहिमेमध्ये सातत्यपूर्ण योगदान देण्याचे कार्य येथे चालते. ‘एल अँड टी’ अवजड अभियांत्रिकीचे सर्व प्रकल्प इंडस्ट्री ४.० सोल्यूशन्सने सुसज्ज असून कंत्राटानुसार अभियांत्रिकी उत्पादन करून देण्यासाठी सक्षम आहेत. ‘एल अँड टी’च्या अवजड अभियांत्रिकी व्यवसायाने जागतिक पातळीवरील शुद्धीकरण प्रकल्प, तेल आणि वायू, पेट्रोरसायने, खते आणि अणूऊर्जा शक्ती अशा उद्योगांना तंत्रज्ञान संवेदनक्षम उपकरणे आणि यंत्रणा पुरविण्याची आपली कामगिरी सातत्यपूर्ण यशस्वी राखलेली आहे.
पार्श्वभूमी:
लासर्न अँड टुब्रो ही ईपीसी प्रकल्प, हाय टेक उत्पादन आणि सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरातील ५० देशांत तिचा कार्यविस्तार आहे. एक सक्षम आणि ग्राहककेंद्री दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण उच्च गुणवत्ता राखण्याच्या आपल्या ध्यासामुळे एल अँड टीने गेली आठ दशके आपल्या प्रमुख व्यवसाय क्षेत्रात आघाडीचे स्थान कायम राखून ठेवलेले आहे.