मुक्तपीठ टीम
माझ्या एका खिशात ब्राम्हण आणि दुसऱ्या खिशात बनिया आहेत असं, वादग्रस्त विधान मध्यप्रदेशमधील भाजपाचे प्रभारी पी मुरलीधर राव यांनी केलं आहे. या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आगामी काळात भाजपा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गावर लक्ष केंद्रित करत आहे. तर दुसरीकडे मुरलीधर यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारी मध्य प्रदेशचे भाजपा प्रदेश प्रभारी पी मुरलीधर राव यांच्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. प्रथम मुरलीधर म्हणाले की ब्राह्मण आणि बनिया हे दोन्ही माझ्या खिशात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मुरलीधर राव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत माफी मागण्याची मागणी केली.
कमलनाथ यांनी ट्विट केले की, “ज्या वर्गाच्या नेत्यांनी भाजपच्या उभारणीत आपली भूमिका बजावली आहे, त्यांना कशा प्रकारचा आदर दिला जातो? भाजपाचे नेते सत्तेची नशा आणि अहंकारात बुडाले आहेत. हा संपूर्ण बनिया आणि ब्राह्मण वर्गाचा अपमान आहे. यासाठी भाजप नेतृत्वाने तातडीने या वर्गांची माफी मागावी.
जिस वर्ग के नेताओ ने भाजपा को खड़ा करने में अपनी महती भूमिका निभायी है , उन वर्गों का यह कैसा सम्मान…?
भाजपा के नेता सत्ता के नशे व अहंकार में चूर हो गये है।
यह तो पूरे बनिया व ब्राह्मण वर्ग का अपमान है।
भाजपा नेतृत्व इसके लिये इन वर्गों से अविलंब माफ़ी माँगे।
— Kamal Nath (@OfficeOfKNath) November 8, 2021
मात्र, या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर पी मुरलीधर राव यांनी सायंकाळी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, आमचा पक्ष हा सर्व वर्गातील ब्राह्मण आणि बनियांचा पक्ष आहे. आमच्यासाठी बनिया आणि ब्राह्मण यांच्यात फरक नाही. भाजपा सर्वांना बरोबर घेऊन चालली आहे.