मुक्तपीठ टीम
स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात आज देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौकांचं जलावतरण झालं. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका ‘सुरत’ , आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील ‘उदयगिरी’ या दोन युद्धनौका आहेत. मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे एकाच वेळी त्यांचे जलावतरण झाले. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे तयार करण्यात आली आहेत.
दोन्ही युद्धनौकांची नावं शहर आणि पर्वत यांच्या नावावरून…
- आयएनएस उदयगिरी (यार्ड १२६५२) या युद्धनौकेचे नाव आंध्र प्रदेशातील पर्वतराजीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
- त्याचबरोबर आयएनएस सुरत (यार्ड १२७०७) ला सुरत शहराचे नाव देण्यात आले आहे.
- या दोन्ही युद्धनौकांच्या बांधणीतून संरक्षण क्षेत्रातील भारताची आत्मनिर्भरता दिसून येते.
‘उदयगिरी’ युद्धनौकेचे वैशिष्ट्ये
- ‘उदयगिरी’ ही युद्धनौका, आंध्र प्रदेशातील पर्वतराजींच्या नावावर आहे.
- हे प्रकल्प १७ए फ्रिगेट्स अंतर्गत तिसरे जहाज आहे.
- हे प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे.
- १८ फेब्रुवारी १९७६ ते २४ ऑगस्ट २००७ या तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या उदयगिरी या युद्धनौकेच्या मागील आवृत्तीचा हा आणखी एक प्रकार आहे.
दोन्ही युद्धनौका स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक आहेत
- फ्रंटलाइन युद्धनौका ‘सुरत’प्रोजेक्ट १५बी डिस्ट्रॉयर आणि ‘उदयगिरी’ प्रोजेक्ट १७ए फ्रिगेट पुढील पिढीतील स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक आहेत.
- आयएनएस सुरत हे प्रोजेक्ट १५बी चे चौथे फ्रिगेट आहे आणि प्रोजेक्ट १५ए म्हणजेच कोलकाता श्रेणीच्या विनाशकारी युद्धनौकेवर एक मोठा बदल आहे.
- सुरत ही युद्धनौका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून बांधली गेली आहे आणि गुजरातची व्यावसायिक राजधानी असलेल्या सुरतच्या नावावरून तिचे नाव देण्यात आले आहे.
- मुंबईनंतर सुरत हे पश्चिम भारतातील दुसरे मोठे व्यावसायिक केंद्र मानले जाते.
प्रकल्प १७ए अंतर्गत युद्धनौकांची बांधणी
- भारतीय नौदलाच्या प्रकल्प १७ए अंतर्गत, ७ फ्रिगट युद्धनौका भारतात बांधल्या जाणार आहेत. ज्याचा भाग आयएनएस उदयगिरी देखील आहे.
- नौदलाच्या म्हणण्यानुसार चार युद्धनौका मुंबईत आणि तीन जीआरएसई कोलकाता येथे बांधल्या जाणार आहेत.
- यातील एक युद्धनौका आयएनएस निलगिरी एमडीएल येथे बांधली जात आहे आणि दुसरी आयएनएस हिमगिरी जीआरएसईद्वारे बांधली जात आहे.
- या नौदल प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारी युद्धनौका शिवालिक-क्लास मिल गाईड फ्रीगेटचा फॉलो-ऑन प्रकल्प आहे.
पन्नासाहून अधिक जहाजं आणि पाणबुड्यांच्या निर्मितीची तयारी
- संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ५० हून अधिक जहाजं आणि पाणबुड्यांची निर्मिती सुरू आहे.
- भारतीय नौदलाकडे आधीच सुमारे १५० जहाजं आणि पाणबुड्या आहेत.
- गेल्या सात वर्षांत नौदलातील सर्व २८ जहाजे आणि पाणबुड्या भारताने बांधल्या आहेत.
नौदलाने ९० हून अधिक युद्धनौकांची निर्मिती केली
- भारताने स्वातंत्र्यानंतर ९ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ९० हून अधिक युद्धनौकांची निर्मिती केली आहे.
- भारतीय नौदलाने मेक इन इंडिया हे राष्ट्रीय मिशन बनण्यापूर्वी ५० वर्षे देशात जहाजबांधणी इकोसिस्टमला प्रोत्साहन दिले.
- त्याच वेळी, १९६४ मध्ये देशांतर्गत केंद्रीय डिझाइन कार्यालयाच्या निर्मितीद्वारे, नौदलाने देशात जहाजबांधणीच्या दिशेने रचनात्मक पावले उचलली आहेत.
- या क्रमाने भारतीय नौदलाने युद्धनौका तयार करण्यात यश मिळवले आहे.