मुक्तपीठ टीम
श्री राम जन्मभूमी अयोध्येतील राम मंदिराचे काम अगदी वेगाने सुरू आहे. राम मंदिराचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या मंदिर उभारणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये प्रभू रामाच्या गर्भगृहाला आकार देण्याचे काम केले जात आहे. गर्भगृहासोबतच मंडप आणि संरक्षक भिंतीचे कामही सुरू आहे. प्रभू रामाच्या गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ट्रस्टने ठेवले आहे.
प्रभू श्री राम मंदिर उभारणीविषयीचे अपडेट्स
- मंदिर उभारणीच्या कामासाठी नावाजलेल्या तांत्रिक एजन्सींच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या मशिन्सद्वारे हे काम केले जात आहे.
- मंदिर उभारणीचे दोन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्यात राम मंदिराचा ५० फूट खोल पाया तयार करण्यात आला.
- दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या रॉफ्टचे काम पूर्ण झाले.
- तिसऱ्या टप्प्यात प्रभू रामाच्या गर्भगृहाचे बांधकाम सुरू आहे. अशाप्रकारे आतापर्यंत मंदिर उभारणीचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा म्हणाले की, “मंदिराच्या पायाचे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. २१ फूट उंचीच्या मंदिराच्या पायात एकूण १७ हजार ग्रॅनाईटचे दगड बसवले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत सात हजार दगड बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गर्भगृहात महापीठाची निर्मिती करण्यात येत आहे. जेथे प्रभू रामाला वीराजमान केले जाईल. त्या भागाला महापीठ म्हणतात. महापीठाच्या उभारणीत आतापर्यंत ४२ दगड टाकण्यात आले आहेत.”
नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी मंदिराची सुरक्षा
- दुसरीकडे मंदिराला नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम दिशेला भिंत उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
- गर्भगृहाचे महापीठ जेथे प्रभू राम चार भावांसह वीराजमान होणार आहे. म
- महापीठाच्या अगदी वर असलेल्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर रामदरबाराची स्थापना करण्यात येणार आहे. ४. दुसरा मजला सध्या रिकामा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिराचा मुख्य दरवाजा गोपुरमच्या आधारावर बांधण्यात येणार
- राममंदिराचा मुख्य दरवाजा गोपुरमच्या आधारावर बांधला जाणार आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल.
- गोपुरम हे दक्षिण शैलीतील मंदिरांवर बनवले जातात.
- दक्षिणेकडील मंदिरांच्या प्रवेशद्वाराला गोपुरम म्हणतात. तो पिरॅमिडच्या आकाराचा आहे.
- राम मंदिराचे प्रवेशद्वारही याच शैलीत बांधले जाईल, उत्तर भारतात त्यांना सिंहद्वार म्हणतात.
- राम मंदिराच्या प्रवेशद्वारात उत्कृष्ट कलाकुसर आणि नक्षीकाम पाहायला मिळणार आहे. प्रवेश करताच रामायणाचा काळ जाणवेल.
- रामकथा आणि देवतांच्या चित्रांमुळे दरवाजाची शोभा वाढेल.