मुक्तपीठ टीम
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न, फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि तेल विपणन कंपनीने आज २५० एमटी प्लॅस्टिक कचऱ्याचे २७,००० एसक्यूएम रस्ता बनवण्यासाठी रिसायकलिंग करण्यात आल्याची घोषणा केली. त्यासाठी कंपनीच्या कॉर्पोरेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरने (सीआरडीसी) विकसित केलेली वेस्ट प्लॅस्टिक रोड (डब्ल्यूपीआर) प्रक्रियेचा वापर करण्यात आला. हा उपक्रम पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करण्याच्या प्रयत्नांतील तसेच अन्न साखळीमध्ये त्याचा समावेश होण्यापासून रोखण्याच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे.
त्याशिवाय हा उपक्रम कंपनीला त्यांचे उर्त्सनाचे ‘नेट झिरो’ ध्येय पूर्ण करण्यास आणि स्वच्छ भारत मिशन यशस्वी करण्यात मोठी मदत करेल. हा उपक्रम देशभरातील पायाभूत सुविधा निर्माणात विस्तारल्यास प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाची समस्या निवारण्यास मदत होईल, शिवाय जीएचजी उत्सर्जन कमी होऊन चक्राकार अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.
हा उपक्रम पुढे नेण्यासाठी बीपीसीएलने नुकतेच मुंबई, महाराष्ट्रातील पाटण साई येथील आपल्या नव्या फ्युएल स्टेशनवरील रस्ता निर्मितीसाठी डब्ल्यूपीआर प्रक्रियेचा वापर केला असून भविष्यात त्याचा इतर ठिकाणीही वापर केला जाणार आहे. साइवरील परिस्थितीनुसार अंदाजे ५०,००० किलो प्लॅस्टिक कचरा/किमी ६ मीटर रूंदीच्या रस्त्यासाठी वापरला जातो. डब्ल्यूपीआर प्रक्रियेच्या मदतीने बीपीसीएलने सहा राज्यांतील २७,०३२ एसक्यूएम जागा व्यापणाऱ्या रस्त्यांसाठी २५० एमटी मिश्र प्लॅस्टिक कचरा वापरला. सीपीसीबीने उत्पादनांच्या प्लॅस्टिक पॅकेजिंगच्या जीवन चक्राचे विश्लेषण केले असून त्यानुसार १ एमटी प्लॅस्टिक कचरा पुनर्निमितीसाठी वापरला गेल्यास अंदाजे ३ एमटी जीएचजी उत्सर्जन कमी होते.
या प्रक्रियेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी प्लॅस्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची गरज नसते. यामुळे मनुष्यबळ लागत नाही तसेच मानवी हस्तक्षेपातून वर्गीकरण करताना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता राहात नाही.
About Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL):
Fortune Global 500 Company, Bharat Petroleum is the second largest Indian Oil Marketing Company and one of the premier integrated energy companies in India, engaged in refining of crude oil and marketing of petroleum products, with a significant presence in the upstream and downstream sectors of the oil and gas industry. The company attained the coveted Maharatna status, joining the elite club of companies having greater operational & financial autonomy.
Bharat Petroleum’s Refineries at Mumbai & Kochi and Bina at Madhya Pradesh have a combined refining capacity of around 35.3 MMTPA. Its marketing infrastructure includes a network of installations, depots, energy stations, aviation service stations and LPG distributors. Its distribution network comprises over 20,000 Energy Stations, over 6,200 LPG distributorships, 733 Lubes distributorships, and 123 POL storage locations, 54 LPG Bottling Plants, 60 Aviation Service Stations, 4 Lube blending plants and 4 cross-country pipelines.
Bharat Petroleum is integrating its strategy, investments, environmental and social ambitions to move towards a sustainable planet. The company has chalked out the plan to offer electric vehicle charging stations at around 7000 energy stations over next 5 years.
With a focus on sustainable solutions, the company is developing a vibrant ecosystem and a road-map to become a Net Zero Energy Company by 2040, in Scope 1 and Scope 2 emissions. Bharat Petroleum has been partnering communities by supporting innumerable initiatives connected primarily in the areas of education, water conservation, skill development, health, community development, capacity building and employee volunteering. With ‘Energising Lives’ as its core purpose, Bharat Petroleum’s vision is to be the most admired global energy company leveraging talent, innovation & technology.