Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसने का केला भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल?

April 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
congress

मुक्तपीठ टीम

 

देशातील चार राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात सध्या निवडणुकीची रणधुमारी पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यावेळी, भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा एक जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते “ईव्हीएम मशीनला होलसेल फ्रॉड” म्हणताना दिसत आहे.

 

Subramanian Swamy ji do you still believe EVM is a “Whole Sale Fraud?” If so would you please join us on our Campaign to go back to Ballot Box? pic.twitter.com/Fb00VXZXRj

— digvijaya singh (@digvijaya_28) April 3, 2021

 

हा व्हिडीओ काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी शेअर करुन आसाममध्ये घडलेल्या घटनेतल्या पार्श्वभूमीवर “आजही तुमचा हाच विचार आहे का? जर असेल तर बॅलेट बॉक्ससाठी आमच्या या मोहिमेत आमच्यासोबत येऊ शकता का? असे प्रश्न ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी यांना विचारले आहेत. आसाममध्ये भाजपा उमेदवारांच्या गाडीत ईव्हीएम मशीन आढळून आल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असून या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश करीमगंज जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

तसेच ईव्हीएम मशीन आढळून आलेली गाडी ही आसाममधील पाथरकांडीच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या भाजपाचे उमेदवार कृष्णेंदू पाल यांची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.


Tags: BJPकाँग्रेसभाजपासुब्रमण्यम स्वामी
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट टीव्हीवरही झाला ब्लॉगबस्टर! गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला. २१ मार्च रोजी ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजीन प्रिमिअर पार पडला. त्यावेळी चित्रपटाला संपूर्ण भारतात ६३ मिलिन व्ह्यूअर्स मिळाले आहेत. 2. अभिनेता विकी कौशल आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जयंतीनिमित्त विकीने त्यांच्या बायोपिकबद्दल एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटासाठीचा विकीचा पहिला लूक २०१९मध्ये समोर आला होता. ‘सॅम बहादूर’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. 3. लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालालने म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनीही करोनाची लस घेतली आहे. यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. 4. सर्वत्र चर्चेत असणारा मराठी चित्रपट म्हणजेच ‘वेल डन बेबी’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. 5. बॉलीवूडमध्ये फॅशन म्हटलं की, समोर नाव येतं ते अभिनेत्री सोनम कपूरचे, ती तिच्या फॅशनसेन्समुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या एका फोटोशूटमुळे सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनमने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या फोटोमध्ये सोनमने सिल्क डसेज सॅटिन ड्रेस आणि ट्राउजर परिधान केलेली आहे. या लूकमध्ये ती हॉट दिसत आहे.

Next Post

“कोरोनाविरोधातील लढा सर्वांचा, राजकारण नको!” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
CM

"कोरोनाविरोधातील लढा सर्वांचा, राजकारण नको!" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!