Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात

March 1, 2021
in घडलं-बिघडलं
1
congress

मुक्तपीठ टीम

पेट्रोल डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले.

nana

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर ८२० टक्के तर पेट्रोलवर २५८ टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर वर तर डिझेलचे दर ९० रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. मुंबईत पॉवर पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत.

nana

आज पुन्हा एलपीजी गॅस सिलींडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्यामुळे गॅस सिलिंडरचा दर ८२५ रुपये झाला आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष असून मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जनता महागाईने होरपळून गेली असताना थंडीमुळे दरवाढ झाल्याचा जावाई शोध लावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी असे पटोले म्हणाले.

यावेळी माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “भाजपचे नेते २०१४ पूर्वी इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते, मात्र आज तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज आज इंधनाचे दर वाढत आहेत, जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे. आम्ही आज सायकल रॅली काढून मोदी सरकारला इंधन दरवाढ मागे घ्या हे ठणकावून सांगितले आहे. जनतेच्या वेदना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा उद्रेक होईल असा इशारा त्यांनी दिला.

nana

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते शरद रणपिसे, माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, अमित झनक, धिरज देशमुख, हिरामण खोसकर, लहू कानडे, डॉ. सुधीर तांबे, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, मोहनराव हंबर्डे, सुभाष धोटे, राजू पारवे, राजू आवळे, शिरीष नाईक, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, डॉ. संजय लाखे पाटील, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेसचे आमदार सहभागी झाले होते.

Previous Post

दुबईत शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

क्रीडा थोडक्यात: १) कोरोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी केली. विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. दडपण वाढवत कॅलाडझिन्स्कायने ४ गुणांची कमाई केली. पण अखेर विनेश हिने १०-८ अशा फरकाने विजय मिळविला. २)भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौऱ्याची शानदार सुरुवात केली. निळकंठ शर्मा (१३व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (२७व्या आणि २८व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (४१व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (४२व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहेय. तर चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय भारताने मिळविला आहे. ३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामातील सामन्यांसाठी चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा पाच शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे. हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही आहे. ४) इंग्लंड विरोधातील अहमदाबादमध्ये कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याने आयसीसीकडून जाहीर झालेल्या रॅकिंगमध्ये सहा स्थानांनी झेप घेतली आहे. तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ धावा केल्या, तर दुसर्या डावात नाबाद २५ धावा केल्या. त्यासोबतच आयसीसीने म्हटले आहे की, आता मालिका संपल्यावर रँकिंग जाहीर होण्याऐवजी मार्चपासून दर आठवड्याला रँकिंग जाहीर होणार आहे. ५) टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कसोटी सामना पार पडल्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला असल्याचे सांगितले जात आहे.

Comments 1

  1. Anita Bafna says:
    4 years ago

    Good move

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!