मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाच्या सहा न्यायमूर्तींच्या बदलीची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती यू. ललित आणि न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
ज्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे त्यात न्यायमूर्ती पी.के. गौरव आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आहेत. न्यायमूर्ती गौरव यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून दिल्ली उच्च न्यायालयात तर न्यायमूर्ती अमानुल्ला यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातून पाटणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या कॉलेजियमच्या निर्णयात म्हटले आहे की, न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांची ओडिशा उच्च न्यायालयातून कोलकाता उच्च न्यायालयात तर न्यायमूर्ती सुभाषीष तलपात्रा यांची त्रिपुरा उच्च न्यायालयातून ओडिशा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती लानुसुंगकुम जमीर यांची मणिपूर उच्च न्यायालयातून गुवाहाटी उच्च न्यायालयात तर जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धीरज सिंह ठाकूर यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.