मुक्तपीठ टीम
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने कोक, पेप्सी आणि बिसलेरीवर ७२ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. हा दंड प्लास्टिक कचऱ्याच्या डिस्पोजल आणि कलेक्शनची माहिती सरकारी बॉडीला न दिल्यामुळे लावण्यात आला आहे. बिसलेरीवर १०.७५ कोटी, पेप्सिको इंडियावर ८.७ कोटी आणि कोका कोला बेवरेजेसवर ५०.६६ कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे.
पतंजलीवर १ कोटींचा दंड
- बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- दुसऱ्या एका ८५.९ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
- या सर्व कंपन्यांना येत्या १५ दिवसांत दंडाची रक्कम भरावी लागेल,असे सीपीसीबीने स्पष्ट केले आहे.
- प्लास्टिक कचऱ्याप्रकरणी एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पांसिबिलिटी एक पॉलिसी मानक आहे, ज्या आधारे प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टच्या डिस्पोजलची जबाबदारी घ्यावी लागते.
९ महिन्यात एवढा टन प्लास्टिक कचऱ्याचा साठा
- बिस्लेरीच्या प्लास्टिकचा कचरा अंदाजे २१ हजार ५०० टन होता. कंपनीच्या प्रति टन कचऱ्यावर ५००० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
- पेप्सी कंपनीचा ११ हजार १९४ टन प्लास्टिक कचरा जमा झाला आहे.
- कोका-कोला कंपनीचा ४ हजार ४१७ टन प्लास्टिक कचरा होता.
- हा कचरा जानेवारी ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा आहे.
कोक आणि पेप्सीकोची प्रतिक्रिया
कोकच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सीपीसीबीकडून नोटीस मिळाली आहे. या आदेशाचा आढावा घेत आहोत आणि संबंधित प्राधिकरणाने तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर पेप्सीकोने दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिक कचर्याच्या बाबतीत ते संपूर्ण प्रक्रिया ईपीआर अंतर्गत पाळतात. तरीही नोटीस पाठविण्यात आली आहे.