मुक्तपीठ टीम
कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीसाठी मायनिंग या पदासाठी २५ जागा, इलेक्ट्रिकल या पदासाठी ११७ जागा, मेकॅनिकल या पदासाठी १३४ जागा, सिव्हिल या पदासाठी ५७ जागा, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग या पदासाठी १५ जागा, जियोलॉजी या पदासाठी १२ जागा अशा एकूण ५८८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ६०% गुणांसह बीई/ बी.टेक/ बी.एससी (इंजिनीअरिंग)/ ६०% गुणांसह एम.एससी/ एम.टेक (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ जियोफिजिक्स/ अप्लाइड जियोफिजिक्स) २) जीएटीई २०२१ असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ११८० रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.