मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाची दुसरी लाट मंदावल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र मुंबईकरांची लाईफ लाईन मुंबई लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लाखो मुंबईकर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच लोकल ट्रेन सुरु करण्याचे संकेत दिलं आहे. यामुळे लाखो मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे येथील एच/पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
CM Uddhav Balasaheb Thackeray inaugurated the new building of the @mybmc H/West Ward office this afternoon. pic.twitter.com/IdWphm7c1a
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी खार एच पश्चिम विभागातील मुंबई मनपाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी कोरोना काळात परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मनपाचं तोंडभरून कौतुक केले. त्याचवेळी, त्यांनी सध्याचे कोरोना निर्बंध व लोकलबाबतही भाष्य केलं. ‘जिथं निर्बंध शिथील केले जाऊ शकतात, तिथं तसा निर्णय घेतलेला आहे. लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. जबाबदारीचं भान ठेवूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,’ असं ते म्हणाले. ‘निर्बंध शिथील न झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी नियम तोडू नयेत. संयम सोडू नये,’ कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अनेक गोष्टी आधी मुंबईत बनतात, मग देशात
- कोरोनाच्या काळात मुंबई मनपानं केलेल्या कामाचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.
- ‘कोरोना काळात मुंबई मॉडेलचं सर्वत्र कौतुक झालं.
- मनपा कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळंच हे शक्य झालं.
- धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाला हरवलं.
- संकटाचा मुकाबला करतानाच नागरिकांच्या सेवेत आणि मुंबईतील विकासकामांमध्ये ही खंड पडू दिला नाही.
- ‘जी पश्चिमचं कार्यालयाचं बांधकाम दूरदृष्टी ठेवून केलं गेलं आहे.
- अनेक गोष्टी आधी मुंबईत बनतात, मग देशात होतात,’ असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.