मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक-मुंबई, मुंबई-पुणे-हैद्राबाद या बुलेट ट्रेन संदर्भात पत्र लिहिलं आहे. यामध्ये दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव त्यांनी मोदी यांना दिला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांदरम्यान विकासाची ब्लू प्रिंट मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीने पावलं उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं.
मुख्यमंत्र्यांचं पत्र जसं आहे तसं
- रेल्वे मंत्रालय, भारत सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या सात हाय स्पीड रेल कॉरिडॉरपैकी महाराष्ट्रात नागपूर-नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे-हैदराबाद यांचा समावेश आहे.
- राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन यांना जागेची पाहणी, व्यवहार्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
- एमएसआरडीसीकडे या कॉरिडॉरच्या एकीकरणासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
- पुढे, NHSRCL ने नागपूर-मुंबई कॉरिडॉरसाठी पर्यायाचा अभ्यास केला आहे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या साथीने हायस्पीड रेल कॉरिडॉर (HSRC) विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- समृद्धी महामार्ग हा एक प्रवेश नियंत्रित हरित महामार्ग प्रकल्प आहे. त्याची रुंदी १२० मीटर राइट ऑफ वे (ROW) तर लांबी ७०१ किमी आहे.
- १५ मार्च २०२१ रोजी NHSRCL प्रतिनिधींनी पर्याय सादर केला आणि नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसोबत समृद्धी महामार्गाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता अभ्यासण्याची विनंती केली.
- प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर हा एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) असून वर आणि खाली लांबी आणि रुंदी अंदाजे १७.५० मीटर असेल, जी पुढे बदलली जाऊ शकते.
- जर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले, तर मुंबई-नाशिक-नागपूर हाय स्पीड रेलची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु केली जाऊ शकते.
- पुढे महाराष्ट्र सरकार असेही सुचवू इच्छिते की, मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे ही समृद्धी महामार्गाच्या RoW मध्ये जालन्यापर्यंत असेल, ती पुढे हैदराबादपर्यंत वाढवली जाऊ शकते.
- महाराष्ट्र सरकारने जालना आणि नांदेड दरम्यान एक्स्प्रेस वेला आधीच मान्यता दिली आहे.
- तर दुसरीकडे NHAI ने आधीच नांदेड ते हैदराबाद एक्सप्रेस वेची योजना आखली आहे.
- हायस्पीड रेलला सामावून घेण्याचे समान तर्क लावल्यास नागपूर आणि मुंबई, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेलचे नियोजन जालना मार्गे मुंबई-नांदेडच्या बाजूनेही करता येईल आणि पुढे प्रस्तावित नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस वे च्या RoW मध्ये नेता येईल.
- त्याचप्रमाणे पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे.
- हे लक्षात घेतले पाहिजे की मुंबई-नागपूर हा मार्ग मुंबई-नाशिक-औरंगाबादला जोडतो. तर मुंबई-हैदराबाद मार्गाचे विद्यमान रचनेनुसार मुंबई ते पुणे हायस्पीड रेल मार्गाला जोडते.
- महाराष्ट्र सरकारने पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी-हायस्पीड रेल्वेची योजना आखली आहे.
- पुणे आणि औरंगाबाद यांच्यात हायस्पीड रेल कनेक्टिव्हिटी झाल्यास हे चतुर्भुज पूर्ण होईल.
- हा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक कॉरिडॉर आहे.
- तर पुणे-नाशिक-औरंगाबाद त्रिकोण आधीच राज्यातील वाहन उद्योगाचा आधारभूत आहे.