मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत ठाकरी बाणा दाखवला. त्यांनी भाजपाच्या त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना सरळस्पष्ट उत्तर दिली. त्यांनी थेट आव्हान देत भाजपाला हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या साऱ्याच मुद्द्यावर खूप काही सुनावलं. ते म्हणाले, “सत्ता हवीय ना? मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका! मुंबई वाचवणाऱ्या शिवसैनिकांना हात लावायचा नाही!” तसंच “जर तुमचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्हीही अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसला असता,” असंही त्यांनी फडणवीसांना स्पष्टपणे सुनावलं.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:
एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच…
- मी बसून बोललो म्हणजे जोर गेला असा कोणी अर्थ काढू नये.
- उठा बश्यानी ताकद वाढते.
- अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेत सहभागी झालेल्यांनी जे काही मुद्दे मांडले ते एका वाक्यात उत्तरं देता येणार नाही. पण इतरांचीही नोंद घेतो.
- काहींवर भाष्य करत असतो.
- मी तळमळीने आणि मनमोकळं बोलणार आहे.
- मला खोटं बोलता येत नाही.
- राज्यपालांच्या भाषणापासून सुरूवात केली तर मला एका मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधाणिक पद आहे.
- याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे.
- पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या पाहिजेत.
- एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घेऊ शकतात, पण राज्याची संस्कृती आहे प्रथा-परंपरा आहे.
- राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरु केल्यानंतर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता.
- राज्यपाल काय बोलत आहेत ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होते.
- त्यावेळी केलेला दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात.
- देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले.
- राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता.
- पण राज्याचे सरकार हे काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात.
- राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही.
- त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल
जेवणात आंबट वरण असतं तसं तोंडी लावायला पर्यावरण!
- राज्यपालांनी माझे शासन समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते असे सांगितले.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करते असे राज्यपालांच्या भाषणात होते.
- पलीकडे राज्य ज्यांनी भाषण होऊ दिले नाही त्यांचे असल्यामुळे राज्यपालांना बोलू दिले नाही की काय हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे.
- त्यानंतर त्यांनी कोरोनामध्ये ऑक्सिजनची कमी असताना तो कसा मिळवला, केंद्राने हजारो किलोमीटरवरुन ऑक्सिजन आणायला लावला हे राज्यपालांच्या अभिभाषणात होते.
- रिकामे टॅंकर एअरलिफ्ट करुन रस्त्याने, रेल्वेने ऑक्सिजन मागवण्यात आले.
ही तीच यंत्रणा आहे. - मुख्यमंत्री कोण वगैरे हा मुद्दा नाही.
- जेवणात आंबट वरण असतं तसं तोंडी लावायला पर्यावरण आहे. पण काम कोण करतं? पण आपलं सरकार काम करतं ?
- ते ऐकून घेतलं पाहिजे.
- स्कॉटलंडचा पुरस्कार आपल्या शासनाने जिंकला.
- महाराष्ट्रातील एकमेव राज्य आहे पुरस्कार जिंकणारं. मला अभिमान वाटतो हे सांगणारे राज्यपाल होते.
आरसा बघितला तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करतात…
- शिवभोजन सुरू केलं.
- दहा रुपयात जेवण देतो ही अभिमानाची गोष्ट आहे.
- हे मोठं काम आहे.
- आजपर्यंत ८ कोटी पेक्षा अधिक थाळ्यांचं वाटप केलं.
- हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.
- आपण त्यावर ५०० कोटी तरतूद केली आहे.
- त्यावर लक्ष ठेवा नाही तर त्यातही भ्रष्टाचार दिसेल.
- काही झालं तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार…आरसा बघितला तरी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करतात.
- पण आरश्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना. पण त्यासाठी चेहरा तर आरशात पाहिला पाहिजे.
मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का?
- ज्यांसाठी हे करत होत ते या योजनांचा लाभ घेत आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत याचेसुद्धा मला समाधान आहे.
- माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये माझी उणिव न भासू देता सगळ्या मंत्र्यांनी उत्तम काम केले त्यांच्याबद्दलही मला समाधान व्यक्त करायचे आहे.
- जे झाले आहे ते झोलेले आहे आणि नाकारण्याचा नाकर्तेपणा कोणी करु नये.
- सुधीर मुनगंटीवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात.
- वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही तर सुपर मार्केटमध्ये मिळत आहे.
- आपल्या बाजूला असलेल्या मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का? देशात एक लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत.
- तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
- हे पाहून आपल्या राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. आपण केलेला विकास राज्यपाल सांगत होते तो आपण समोर येऊ दिला नाही.
- याची दखल नागरिक घेत असतात.
रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत,काही जणांचा जीव मुंबईत!
- रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत होता.
- पण काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत आहे.
- मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे.
- जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार.
- यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे.
- पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते.
- आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे.
- मुंबईत केलेल्या कामांचा पाडा मुख्यमंत्र्यांनी आज वाचून दाखवला आहे.
- यावेळी ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट दिली आहे.
- १३९ प्रकारच्या मोफत तर काही नाममात्रं दरात चाचण्या करून देत आहोत.
- मुंबई मॉडल जगभरात प्रसिद्ध झालं आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलं.
- कोरोनामधून बरे होतात.
- पण द्वेषाच्या कावीळ जरी झाली असेल तर त्याचा उपचार कोणत्या दवाखान्यात करता येत नाही.
- कावीळ झालीय. पण द्वेषाची कावीळ बरीच होऊ शकत नाही. त्याला काय करणार.
धारावी पुनर्विकास प्रकल्प करणार…
- तसेच मेट्रोचं काम आपण बंद केलं नाही. अजून वाढत आहोत. मेट्रोच्या काळात १० हजार कोटीच्या वाढीचा प्रस्ताव हा आमच्या काळात नाही.
- तुमच्या काळातला आहे.
- मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार, २ एप्रिलपासून कामाला सुरुवात करतोय असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
- तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्प करायचा आहे.
- रेल्वेची ४५ एकर जमीन आहे.
- अर्धे पैसे भरले.
- पण केंद्र काही दर्जा देत नाही, असे म्हणतानाच मराठी भाषा अभिजात दर्जा काही होत नाही.
- बॉम्बेचं मुंबई उच्च न्यायालय काही होत नाही. सीमाप्रश्न सोडवलं जात नाही.
- केंद्र सरकार कुणाची बाजू घेतं हे पाहिलं तर दिसून येईल.
दहिसर भुखंडांचा पाठपुराव्यात पालिकेचा आक्षेप!
- दहिसरचा भुखंडांचा पाठपुरावा कोणी केला.
- २०११ पासून महापालिकेत त्याचा पाठपुरावा सुरू होता.
- त्यात फडणवीसांची सही आहे.
- एक्झामिन आणि डू द नीडफूल, असा रिमार्क असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- त्यावेळचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, त्यांचा उल्लेख केला तर चालेल ना?
- केरळाचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं नाही होणार ना?
- मी विचारतो, मला माहीत नाही या गोष्टी.
- हॉस्पिटल व्हावं ही सर्वांची भूमिका आहे.
- भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत भालचंद्र शिरसाटने ठेवला होता.
- दर ठरवण्याचं काम पालिका करत नाही.
- महसूल खातं करतं.
- पालिकेने ज्यादा दराला आक्षेप घेतला होता.
कौतुक करू नका, पण घरच्या म्हातारीचा काळ होऊ नका…
- पालिकेने कोरोना काळात चांगलं काम केलं.
- कोरोना काळात मोदींना पक्षभेद विसरून सर्वांना समान मदत केली.
- मी कबूल करेल.
- त्याबाबत मी कद्रूपण करत नाही.
- केंद्राने सेक्रेटरीचा गट तयार केला होता.
- त्यांनी पीपीई किट्स ऑक्सिजन दिले.
- ज्यावेळी गरज होती, त्यावेळी त्यांनी पुरवल्या. टेंडर काढल्या होत्या. वाटाघाटी करून किंमती ठरवल्या होत्या.
- कोणी तरी बुडत असेल तर पोहता येत नसेल तर टायर आणि लाकूड देऊन वाचवणार की टायरचं टेंडर काढणार.
- काही तरी करतो ना.
- पालिकेने शॉर्ट टेंडर काढून काम केलं.
- धारावी वाचवली. सर्वांनी कौतुक केलं.
- केंद्राचं पथक यायचं ते थरथरायचं.
- ते म्हणायेच काही करा पण धारावी वाचवा.
- पालिकेची यंत्रणा धारावीत उतरली.
- त्याचं कौतुक करू नका, पण घरच्या म्हातारीचा काळ होऊ नका.
आम्ही देशद्रोहाच्या विरोधात…
- हा दाऊद आहे कुठे माहीत आहे कुणाला? म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार? राम मंदिराचा विषय किती काळ घेतला आधी रामाच्या नावाने मतं घेतली आता दाऊदच्या नावाने घेणार आहे का? मुंडे म्हणाला दाऊदला फरफटत आणू आता आपण दाऊदच्या मागे फरफटत जातो.
- ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली होती का हो? ओबामाने टॉवर पाडल्यानंतर वाट पाहिली नाही. त्याने घरात घुसून लादेनला मारलं.
- याला म्हणतात मारणं, याला म्हणतात मर्द पणा.
- दाऊदच्या घरात घुसून मारा.
- दाखवा हिंमत, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिलं.
- तसेच आम्ही देशद्रोहाच्या विरोधात आहोत.
- त्याबातब दुमत नाही मलिकांचा राजीनामा मागता मग काश्मीरात तुम्ही मुफ्तीसोबत बसाल?
- अफजल गुरूला फाशी देऊ नका असं मुफ्तीचं विधान होतं. पार्थिव कुटुंबाला द्या, म्हणाले होते.
- त्यावेळी सत्तेत भाजप होता.
- तुम्ही सत्तेचा पाट मांडला होता. त्यावेळी त्यांची मते कशी होती?
हा धृतराष्ट नाहीये,हा महाराष्ट्र आहे!
- सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पाहटेच्या शपथविधीचाही पुन्हा समाचार घेतला.
- तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नाीच विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे.
- मर्द असेल तर अंगावर या, बघतो तू आहे आणि मी आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.
- मागे गडकरी म्हणाले आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो.
- तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का? म्हैसूर साबण लावायचा बघा झाला स्वच्छ हे सर्व होतंय असं समजू नका की कोण बघत नाही.
- आपला पिता धृतराष्ट्र होता. तसा हा धृतराष्ट नाहीये.
- हा महाराष्ट्र आहे.
- अशा वाटेला जाऊ नका. यातून कोणाचं भलं होत नाही.
- मी घाबरलोय म्हणून मी बोलत नाही. ही संधी आहे.