मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील मास्कसक्ती आता संपली आहे. आता मास्क घाला किंवा घालू नका, ती बाब ऐच्छिक करण्यात आली आहे. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र जनतेला मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, निर्बंध संपले असले तरी जोपर्यंत ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मास्क घालत आहेत तोपर्यंत लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे. मास्क वापरणे अनिवार्य आहे.
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी मास्क घालण्याच्या अनिवार्यतेसह कोरोनाशी संबंधित इतर सर्व निर्बंध २ एप्रिलपासून संपविण्याची घोषणा केली होती.
शहरातील नवीन मेट्रो मार्गाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मास्क घालणे आता बंधनकारक नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आता संसर्गापासून बचाव करण्यासाठी खबरदारीकडे दुर्लक्ष करू शकतो.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “बहुतेक लोक मास्क घालत नसल्याचे मी पाहिले आहे. राज्यात फक्त दोनच लोक आहेत, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे कोरोना साथीच्या आजाराच्या सुरुवातीपासून सतत मास्क परिधान करत आहोत. जनतेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सुरू ठेवावे. सर्वांनी खबरदारी घेतली तरच साथीच्या पुढील लाटेचा धोका टाळता येईल.”