Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण

July 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
dr shrikant shinde

मुक्तपीठ टीम

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा, अशा शुभेच्छापर आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

 

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेची चावी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रश्मी ठाकरे, युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, समिती सदस्य संभाजी राजे शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी आम्ही डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडे केली होती. आज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिका आमच्या ताब्यात मिळत असल्याने आमचा आनंद द्विगुणित होत आहे. सदर रुग्णवाहिका पंढरपूर परिसरातील गरजू रुग्णांना मोठा आधार ठरेल, असा विश्वास औसेकर महाराज यांनी व्यक्त केला. तर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी रुग्णवाहिका भेट दिल्याबद्दल डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सर्वेसर्वा आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांचे आभार मानले.

 

यावेळी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी संयुक्तपणे संपादित केलेल्या वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथाच्या प्रति मुख्यमंत्री महोदय यांच्यासहित उपस्थित सर्व मान्यवरांना भेट देण्यात आल्या.समस्त महाराष्ट्रीय लोकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची कोरोना महामारीतून मुक्तता करा,अशी भगवान श्री विठ्ठलाला आपण सर्वजण साकडे घालूया.

 

रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


Tags: ALS रुग्णवाहिकाchief minister uddhav thackerayDr Shrikant Shinde foundationDr. Shrikant ShindeMinister Eknath ShindeShivsenaएकादशीडॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनडॉ. श्रीकांत शिंदेमंत्री आदित्य ठाकरे
Previous Post

पेगॅसस हेरगिरी: अमित शाह यांच्या ‘क्रोनोलॉजी’ आरोपामागील रणनीती समजून घ्या!

Next Post

शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

Next Post
Navy officers

शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!