मुक्तपीठ टीम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासंदर्भात आढावा बैठक २ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अथितीगृह मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, आयआरबीचे प्रमुख अधिकारी व विविध खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत डीजीसीए समितीने चिपी विमानतळाची पाहणी केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ज्या त्रुटी काढल्या आहेत. त्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यातल्या बहुतांशी त्रुटी दूर केल्या असल्याचे आयआरबीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरीत त्रुटी देखील पूर्ण करण्याची ग्वाही आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व त्रुटी १० फेब्रुवारी पर्यंत दूर करण्याचे आदेश आयआरबीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे चिपी विमानतळासंदर्भात १० फेब्रुवारी रोजी पुन्हा आढावा बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.