Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना खडे बोल

September 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
cm

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविडवरील राज्य कृतीदलाने “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे रविवारी आयोजित केले होते. यावेळी याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. . त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तसंच उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली आहे.अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांना सुनावले.

 

मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा

  • मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे.
  • हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत.
  • पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत.
  • मग अशावेळी घाई गर्दी केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही.

 

जनतेच्या जीवाशी खेळू नका

  • राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत.
  • पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी आहे.
  • त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा.
  • अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा.
  • राजकारण आपल्या सर्वांचं होतं.
  • पण जीव जनतेचा जातो.
  • जनतेच्या जीवाशी खेळू नका.
  • आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा.

Maha CM

शत्रू पूर्णपणे पराभूत झालेला नाही

  • तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे.
  • दुर्देवाने ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी यादृष्टीने उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत.
  • आज कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे.
  • जगभरात तिसऱ्या लाटेचे थैमान सुरु आहे.
  • अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
  • तिसरी लाट आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी हा त्यामागचा प्रयत्न आहे.
  • आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत झालेला नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक.

 

कोरोनाविरुद्धच्या युद्धात शस्त्रे परजवून ठेवण्याची हीच वेळ

  • आता सणवाराचे दिवस सुरू झाले आहेत.
  • गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत.
  • गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली.
  • यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.
  • आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच.
  • ती थोपवायची आहे.
  • राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे.
  • कोरोना विरुद्ध युद्ध करताना आपली शस्त्रे परजवून ठेवण्याची हीच वेळ आहे.

Tags: BJPchief minister uddhav thackeraycorornamaza doctormnsगणेशोत्सव
Previous Post

प्रा.डी .एम ललवाणी यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

Next Post

राज्यात ४ हजार ५७ नवे रुग्ण, ५ हजार ९१६ रुग्ण बरे! मुंबईतील रुग्णसंख्या वाढतीच!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ४ हजार ५७ नवे रुग्ण, ५ हजार ९१६ रुग्ण बरे! मुंबईतील रुग्णसंख्या वाढतीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!