लवंग घरात असतेच असते. प्रत्येक स्वयंपाकघराच्या मसाल्याच्या डब्यात लवंग मिळतेच. सहज उपलब्ध असलेल्या लवंगचा उपयोग चवीपुरता नाही, तर आयुर्वेदिक औषध म्हणूनही आहे. लवंगचा उपयोग बर्याच रोगांपासून मुक्तीसाठी केला जातो. आयुर्वेदात लवंगचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी नमुद केला आहे. कारण त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. लवंगप्रमाणेच मधातही औषधी गुण आहेत. लवंग आणि मध एकत्र आले तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.
मध आणि लवंगाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासह आणि त्वचेशी संबंधित अनेक आजार बरे होतात.
लवंग आणि मधाचे फायदे:
मुरुमांवर इलाज
• मध आणि लवंगाचे सेवन मुरुमांना दूर करते : रोज मध आणि लवंगाचे सेवन केल्यास मुरुम बरे होतात.
• मधात पेप्टाइड्स, व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी एसिड असतात.
• यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होतो.
• त्यात अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म देखील आहेत, जे त्वचेला संक्रमणापासून वाचवतात.
घसेदुखीवर उपाय
• मध आणि लवंगाचे एकत्र सेवन केल्याने घशातील वेदना कमी होतात.
• मध आणि लवंगाचे मिश्रण घसा संसर्ग बरे करते, त्याने आराम पडतो.
• यासाठी लवंगाचे तीन तुकडे करा आणि त्यात एक चमचा मध घाला.
• ५ तास असेच सोडा. यानंतर लवंगा काढा आणि मध चाटा.
• त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या.
तोंडातील जखमांवर औषधी
• तोंडामध्ये जखमा होतात. त्या अल्सरसारख्या त्रासदायक होतात.
• त्यावरही लवंग खूप फायदेशीर आहे.
• कारण त्यात एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत, जे तोंड बरे करतात.
• अर्धा चमचा लवंग पावडर एका चमचा मधात मिसळा, ते मिश्रण तोंडातील जखमांवर लावा
मळमळीची समस्या दूर
• लवंग आणि मध यांचे मिश्रण उलट्या आणि मळमळीवर देखील फायदेशीर आहे.
• ५ भाजलेल्या लवंगाची भुकटी बनवून मधात चांगली मिसळा.
• जेव्हा आपल्याला मळमळ जाणवते तेव्हा हे मिश्रण चाटणे खूप फायदेशीर आहे.