मुक्तपीठ टीम
दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातील अनेक भाविकही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ३५ ते ४० यात्रेकरु अजूनही अडकल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे, एसडीआरएफ आणि बचाव पथकाच्या तुकड्या तैनात असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे २५ तंबू आणि तीन नांगर उद्ध्वस्त झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
First visuals of cloudburst near #Amarnath cave where reports suggest some casualities have also taken place. A stream of water can be seen coming down close to the mouth of the cave.#cloudburst #AmarnathYatra pic.twitter.com/Zcfs9E1xvb
— Arjun Sharma (अर्जुन शर्मा) (@arjunsharma_86) July 8, 2022
ढगफुटीमुळे ४० जण बेपत्ता!
- शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अमरनाथच्या गुहेपासून २ किमी अंतरावर ही ढगफुटी झाली.
- ढगफुडीवेळी गुहेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते.
- या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
- ४० जण बेपत्ता आहे.
- गुहेजवळ अडकलेल्या प्रवाशांना पंचतरणी येथे नेण्यात आले आहे.
- पोलीस, लष्कर आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत.
- अनेक जखमींना एअरलिफ्ट केले जात आहे.
- मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- जम्मू-काश्मीर प्रशासनाने वाढलेला धोका पाहता तूर्तास अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे.
#AmarnathYatra22 #RescueOps #Update
🔸#Cloudburst leads #flashflood/landslide
🔸At Lower Holy Cave of Amarnath (J&K)
🔸Rescuers save 5 precious lives
🔸Joint Search & Rescue Ops continues#आपदा_सेवा_सदैव_सर्वत्र@HMOIndia@BhallaAjay26@AtulKarwal@PIBHomeAffairs@PIBSrinagar pic.twitter.com/XhjSjJiOde— NDRF 🇮🇳 (@NDRFHQ) July 9, 2022
प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जारी!!
प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
हेल्पलाइन क्रमांक
- एनडीआरएफ : ०११-२३४३८२५२, २३४३८२५३
- काश्मीर विभाग : ०१९४-२४९६२४०
- श्राइन बोर्ड हेल्पलाइन : ०१९४-२३१३१४९
- संयुक्त पोलीस नियंत्रण कक्ष पहलगाम: ९५९६७७९०३९, ९७९७७९६२१७, ०१९३६२४३२३३, ०१९३६२४३०१८
- पोलीस नियंत्रण कक्ष अनंतनाग: ९५९६७७७६६९, ९४१९०५१९४०, ०१९३२२२५८७०, ०१९३२२२२८७०
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “श्री अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीच्या घटनेने दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीमुळे बाधित झालेल्या लोकांच्या सुटकेचे काम वेगाने करण्यात यावे, असे निर्देश दिले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपालांनी शोक व्यक्त केला
मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल रमेश बैस यांनी अमरनाथ दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की अमरनाथ गुंफा परिसरात ढगफुटीमुळे अनेक यात्रेकरू जखमी झाल्याची दुःखद बातमी आहे. देव दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबियांना या दुःखाच्या वेळी सहन करण्याची शक्ती देवो.
धबाधबा कोसळतो पाऊस: जाणून घ्या ढगफुटी…का होते, कशी धोकादायक?