मुक्तपीठ टीम
कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व हे सर्व कोल्हापूरकरांसाठी आपुलकीचा सोहळा. त्या निमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या काळात राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व संपन्न होणार आहे. या निमित्ताने शाहू मिलमध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता अभियानात हिल रायडर्स, ॲडव्हेंचर फौंडेशन, मावळा ग्रुप, सार्तक क्रीयशन, हॉटेल मालक संघटना, वृक्ष प्रेमी संघटना, जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे कर्मचारी, मिल कॉलनीतील नागरीक, महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह कोल्हापूर शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, शाहूप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे, असे शाहू मिल येथील स्वच्छता मोहिमेच्या प्रसंगी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.
शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पुन्हा एकदा सर्वांसमोर आण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शाहू महाराजांनी सुरु केलेली ही पहिली कापड मिल आहे. कापड व्यवसायाच्या इतिहासामध्ये या मिलचे नाव आजही आदराने घेतले जाते. शाहू मिलचा परिसर मोठा असून फार कमी लोकांनी या मिलमध्ये प्रवेश केला आहे. या मिलच्या आवारात राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील कार्यक्रम घेतले जाणार आहेत. राज्य शासनानेही मिलमध्ये कृतज्ञता पर्वातील कार्यक्रम घेण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे कार्यक्रमापूर्वी मिल व परिसराची स्वच्छता होणे गरजेचे आहे. यासाठी आज ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे. स्वच्छतेचे काम संपेपर्यत मोहिम राबविली जाणार असून स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला नमन करुया, असे अवाहनही जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले.
पाहा व्हिडीओ :