मुक्तपीठ टीम
मुंबईतील उपनगरामध्ये अनेक नैसर्गिक तलाव आहेत. त्यातील अनेक आजही पाण्याने भरलेले असतात. मात्र, अनेकदा त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. वांद्रे पश्चिम भागातील वांद्रे तलावही तसाच. अनेकदा सौंदर्यीकरण झालेलं पण अस्वच्छतेमुळे अवकळा आलेला. संकेत जळगांवकर आणि गौरव मोरे यांचे या तलावाच्या अस्वच्छतेकडे लक्ष गेले. त्यांनी जानेवारीमध्ये क्लिन स्वीप संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वांद्रे तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली.
क्लिन स्वीपने माझी वसुंधरा अभियानांतर्गत वांद्रे तलावाचे रुप बदलण्याचे ठरवले. जानेवारीपर्यंत डम्पिंग यार्ड बनलेल्या भल्यामोठ्या तलावाची संस्थेच्या स्वयंसेवकांनी साफसफाई सुरू केली आहे. गेली तीन महिने स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर वांद्रे तलाव आता चांगला स्वच्छ झाला आहे. स्वामी विवेकानंद मार्गासारख्या मुख्य मार्गाशेजारील हा तलाव आता पुन्हा पर्यटकांचे आकर्षण ठरु शकेल.
संकल्प क्लिन स्वीपचा, स्वच्छता आणि सुंदरता!
• अनास्थेतून अस्वच्छ झालेली एखादी विशिष्ट जागा निवडायची. ती स्वच्छ आणि सुंदर बनवायची, त्यानंतर पुढे वळायचं.
• लवकरच संपूर्ण मुंबई स्वच्छ करण्याचं स्वप्न.
• पन्नासपेक्षा जास्त तरुण स्वयंसेवक पर्यावरण स्वच्छतेसाठी अथक प्रयत्न करणार.
क्लिन स्वीपच्या संकल्पाला राहुल कनाल यांचे मी-मुंबई फाऊंडेशन, रायन मेनेझिस, युवा सेनेचे वांद्रे पश्चिमचे विभाग अधिकारी अक्षय पनवेलकर यांचेही सहकार्य लाभत आहे.
पाहा व्हिडीओ: