मुक्तपीठ टीम
आता मध्यम आणि उच्च आर्थिक गटातील ग्राहकांना या योजनेद्वारे घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक गोड बातमी दिली आहे. जानेवारी महिन्यात सिडकोच्या सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. घणसोली, खारघर, कंळबोली आणि तळोजा, द्रोणागिरी इथे घरांची सोडत काढण्यात येणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान आवास योजनांच्या लाभार्थीना याचा फायदा होणार आहे.२४ फेब्रुवारी पर्यत अर्ज करून नोंदणी करता येणार आहे, एकूण घरांपैकी प्रधान मंत्री आवास योजने साठी १५२४ घर उपलब्ध असून उर्वरित ४२०६ सर साधारण प्रवर्गासाठी उपलब्ध होणार आहेत.
एकनाथ शिंदेंचं सामान्यांना आवाहन
- ७३० व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोच्या वतीने ५७३० घरांच्या सोडतीला सुरुवात करण्यात आली आहे.
- सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही विशेष सोडत जाहीर करण्यात आली आहे.
- आजपासून फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
- त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.
२४ फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार
- एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या ५७३० घरं तळोजा येथे गृहनिर्माण योजना सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १५२४ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.
- या मधील लाभार्थ्यांना अडीच लाखाच्या अनुदानाचा लाभ होणार आहे.
- उर्वरित घर सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील.
- सर्व नागरिकांच्या परवडणाऱ्या घरांसाठी शासन कटिबद्ध आहे.
- सिडकोच्या लॉटरीसाठी नोंदणीला आजपासून सुरुवात होत असून २४ फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार असल्याचंही मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
सिडकोचा ५७३० घरांचा प्रकल्प
- सिडकोतर्फे तळोजा येथे ५७३० सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
- सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोची एक नवीन महागृहनिर्माण योजना सुरु होत असल्याची माहिती सिडकोच्यावतीनं देण्यात आली आहे.
- नवी मुंबईतील तळोजा नोडमधील ५७३० सदनिका यामध्ये उपलब्ध असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य प्रवर्ग यामध्ये पात्र असतील.