Friday, May 30, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडको मेट्रो प्रकल्पाच्या मार्ग क्र. 1 च्या अंमलबजावणीचे काम महामेट्रोला

January 6, 2021
in प्रेस रिलिज
0
MAHA METRO

सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील 11.1 कि.मी. च्या मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला. यानुसार मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे काम यापुढे महा मेट्रो करणार आहे.

 

 

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सिडको नवी मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प साकारत आहे. मार्ग क्र. 1 वर सप्टेंबर 2019 मध्ये मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली होती. मेट्रो प्रकल्पासाठी सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांचा आणि त्यातील व्यामिश्रतेचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये विद्युत पुरवठा, माहिती तंत्रज्ञान, स्थापत्य आणि यांत्रिक अभियांत्रिकी, दूरसंचार आणि संदेशवहन या विविध बाबींचा समावेश होता.

 

 

“प्रकल्पासाठी अर्थपुरवठा, आर्थिक शिस्त, मेट्रो मार्गालगच्या जमिनीचे मुद्रीकरण, प्रवासी भाड्याव्यतिरिक्त अन्य महसूल वाढवणे आणि उत्तम परिवहन जोडणी देणे या बाबींवरही आपण लक्ष केंद्रीत करणार आहोत. परिवहन केंद्रीत विकासाकरिता आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

-डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

 

 

सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीचे काम काही तांत्रिक कारणांमुळे तसेच कोविड-19 मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने होत नव्हते. यामुळे सदर मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, या निकषांचा विचार करून या मार्गाचे काम महा मेट्रो यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महा मेट्रो या कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. यामुळे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 वरील उर्वरित कामांची जलदरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरिता महा मेट्रोची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे.

 

 

या निर्णयामुळे मेट्रो मार्ग 1 वरील जलद गतीने पूर्ण होऊन या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. तसेच या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना आणि नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळणार आहे. नवी मुंबईकरांना प्रवासाचा जलद व सुखद पर्याय देण्यासह नवी मुंबईच्या आर्थिक विकासातही नवी मुंबई मेट्रो प्रकल्प योगदान देणार ठरणार आहे.

 


Tags: CIDCOcovid-19mahametromumbainavi mumbaiनवी मुंबईमहामेट्रोमुंबईसिडको
Previous Post

स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!

Next Post

रोज आठ ग्लास पाणी प्या, ‘या’ आजारांना पळवा!    

Next Post
drink water

रोज आठ ग्लास पाणी प्या, ‘या’ आजारांना पळवा!    

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!