मुक्तपीठ टीम
तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कोणत्याही बँकेत गेल्यास, बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर पाहते. बँक किंवा वित्तीय कंपनीकडून किती व्याजावर किती कर्ज मिळेल, ते सिबिल स्कोर किती चांगला आहे यावर अवलंबून आहे.
सिबिल स्कोर हा जितका जास्त असेल तितका कमी व्याजदर आणि कर्ज सहज उपलब्ध होते. सिबिल स्कोर चांगला नसल्यास कर्ज मिळणे कठीण आहे आणि ते महागड्या व्याजानेही मिळेल. सिबिल स्कोरमध्ये सर्व वैयक्तिक माहिती, नोकरीचे डिटेल्स, बँक अकाउंट आणि जुन्या कर्जाचे डिटेल्स असतात. आजकाल विमा कंपन्याही हा स्कोर पाहतात. सिबिल स्कोर ० ते ९०० पर्यंत आहे.
सिबिल स्कोअर चांगला आणि वाईट यांमधील फरक
- ५५० खूप वाईट
- ५५०-६५० वाईट
- ६५०-७५० सरासरी
- ७५० चांगले
- ७५०-९०० सर्वोत्तम
व्यावसायिक संस्थांसाठी, सिबिल स्कोर १ ते १० पर्यंत असतो. ०१ हा सर्वोत्तम मानला जातो, तर १० गुण सर्वात वाईट मानला जातात.
कोणतेही कर्ज घेतले नसल्यास, कोणत्याही बँक किंवा एनबीएफसी किंवा फिनटेक कंपनीकडून कर्ज घेतले नसेल तर सिबिल स्कोर शून्याच्या खाली जाईल. तुम्ही वेळेवर कर्जाची नियमित परतफेड केल्यास, सिबिल स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असेल.
या चार एजन्सी स्कोअर तयार करतात
- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सिबिल स्कोरशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी चार एजन्सींना अधिकृत केले आहे.
- सिबिल, एक्सपेरियन, इक्विफॅक्स आणि हायमार्क्स या संस्था बँका, एनबीएफसी, फिनटेक कंपन्या अशा विविध स्रोतांकडून कर्ज घेणे, कर्जाची परतफेड करणे यासह माहिती गोळा करतात.
- यावर आधारित, सिबिल स्कोर तयार केले जातात.
- कर्ज घेण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडे किती वेळा चौकशी केली हेही संस्था पाहतात.
- व्यावसायिक संस्थेचे लेखापरीक्षकही न्यायालयात प्रलंबित प्रकरणांसारखी माहिती गोळा करतात.
कर्ज घेताना कोणती काळजी घ्यावी?
- कर्ज वेळेवर भरणे, हप्ता चुकणार नाही याची योग्य काळजी घ्यावी लागते.
- कमाईच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज म्हणून घेऊ नये.
- कर्जासाठी वारंवार अर्ज करू नका आणि त्यासाठी कोणाला मंजुरी देऊ नका.
- गरजेनुसार कर्ज घ्या. आकर्षक ऑफर आणि आकर्षक व्याजामुळे कर्ज घेऊ नका.
- दीर्घ कालावधीसाठी कर्ज घ्या. यामुळे हप्ता देखील कमी होईल, ज्यामुळे पेमेंट सोपे होईल.