मुक्तपीठ टीम
भारतात अद्याप मुलांचं लसीकरण सुरु झालेलं नाही. पण जर जास्तीत जास्त संख्येने प्रौढांचं लसीकरण झाले तर मुलांसाठी संसर्गाचा धोका तेवढाच कमी होईल. त्यामुळेच मुलांच्या आजूबाजूला असलेले प्रौढ मग ते कुटुंबातील सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण आवश्यक मानले जात आहे. त्यासाठीच मुंबईतील गौतम भंसालींच्या गोल्डन अवर फाऊंडेशनने एक वेगळी मोहीम सुरु केली आहे.
ही मोहीम खार दांडा झोपडपट्टी भागात, वरळी कोळीवाडा, वांद्रे आणि गोरेगाव या भागात राबवली जात आहे. या मोहिमेसाठी शाळकरी मुलांचीही मदत घेतली आहे. या शाळकरी मुलांच्या मदतीने लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना लसीकरणाबद्दल काही गैससमज आहे. त्यामुळेच डॉ. गौतम भन्साळी यांच्या गोल्डन अवर फाउंडेशनच्या मदतीने २६ मुले या परिसरात कोरोना लसीबद्दल जनजागृतीत सहभागी झाले आहेत. विशेषत: तुम्ही लस घ्याल तर तुमची आमच्यासारखी मुलेही सुरक्षित होतील, असे पटवून दिले जात आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात झोपडपट्टी भागातील प्रौढ लसीकरणाकडे वळत आहेत.
मुलांची प्रौढांना लसीकरणासाठी प्रेरणा
- लस घ्याल तर सुरक्षित राहाल.
- आमच्यासारखी तुमची मुलेही सुरक्षित असतील.
- ती न घाबरता योग्य काळजी घेऊन शाळेत जाऊ शकतात.
- १८ पेक्षा जास्त वयोगटासाठी मान्यता मिळाल्यावर त्यांनाही लस मिळू शकते.
- मिशन १०० लवकरात लवकर साध्य करा.
- झोपडपट्टीतील प्रौढांना शाळकरी मुलांनी जसं समजावून सांगितले ते मनाला भिडणारे होते.
पाहा व्हिडीओ: