मुक्तपीठ टीम
आय ई एस मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर मुंबई या शाळा प्रशासनाने इयत्ता ५ वी ते १० वीच्या एकूण ३० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क न भरल्याने ऑनलाईन शिक्षण अजूनही बंद ठेवल्याचे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या नितीन दळवी यांना शिक्षण निरीक्षक दक्षिण यांनी माहितीच्या अधिकार अंतर्गत पाठविलेल्या पत्रानुसार निदर्शनास आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महासंघाचे नितीन दळवी यांनी त्वरित महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे सचिव उदय जाधव व प्रशासकीय अधिकारी माधवी भोसले यांची भेट घेऊन त्यांच्या कडे मुलांचे शिक्षण बंद असल्या बद्दल लेखी तक्रार दिली व आय ई एस मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर मुंबई या शाळा प्रशासनावर ताबडतोब कारवाई करून विद्यार्थ्यांचे शिक्षण त्वरित सुरु करावे असे नमूद केले.
तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बालहक्क अयोग्य यांनी दखल घेऊन दिनांक २३/०२/२०२२ रोजी आय ई एस मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर शाळा प्रशासनाला तातडीची नोटीस पाठवून त्यांच्या कडे विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद ठेवल्याबाबत विस्तृत अहवाल व सद्यस्थितीची माहिती ७ दिवसाच्या आत मागितली आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि १२/०८/२०२१ रोजी शालेय शिक्षण विभागाने जरी केलेल्या शासन निर्णयानुसार कुठल्या हि शाळा प्रशासनाने शुल्काच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शिक्षण रोखू नये असे स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा कित्येक खाजगी शाळांनी निर्देश जुगारून शुल्क न भरल्या कारणाने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद ठेवले हि बाब अतिशय गंभीर व चिंताजनक आहे , यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर शाळा प्रशासनाने केलेच पण अश्या मुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले आहे. असे किती विद्यार्थ्यांचे शिक्षण अजून किती खाजगी शाळा प्रशासनाने बंद ठेवले आहे त्याची चौकशी करून अश्या शाळा प्रशासनावर ताबडतोब कारवाई करावी व विद्यार्थ्यांचे शिक्षण त्वरित सुरु करावे अशी मागणी महाराष्ट्र विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाकडे आहे.