मुक्तपीठ टीम
मुंबईत आलेल्या प्रत्येकाची पावलं वळतात ती दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे. इतिहास अनुभवण्यासाठी, त्या आठवणी जागवण्यासाठी तसे केले जाते. त्याचबरोबर कलाप्रेमींसाठी जहांगीर आर्ट गॅलरी एक जिव्हाळ्याचं ठिकाण. आता ११ महिन्यांनंतर दोन्ही वास्तू पुन्हा उघडल्या आहेत.
गेली अकरा महिने दोन्ही वास्तू बंद होत्या. आता अनलॉकच्या नियमांनुसार त्या उघडल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रालय काही मर्यादांसह उघडले गेले आहे. तर शहरातील प्रमुख कला केंद्र म्हणून ओळखली जाणारी जहांगीर आर्ट गॅलरी उघडली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे वेगवेगळे भाग टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होतील.
कार्ल खंडाळावाला गॅलरी ऑफ इंडियन आर्टिफॅक्ट्स, मनी अँड ज्वेलरी गॅलरी आणि मुलांचे संग्रहालय, कुटुंबांना आरामासाठी सुंदर मॅनिक्युअर लॉन उपलब्ध केले जातील. संग्रहालयाच्या तिकिटांचे दरही कमी केले आहेत.
पाहा व्हिडीओ: