Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार”

ओबीसी राष्ट्रीय परिषदेत मंत्री छगन भुजबळांचे आवाहन

December 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal speech in national obc conclave

मुक्तपीठ टीम

देशातील ओबीसींचे राजकीय  आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

समृद्ध भारत फाउंडेशनच्यावतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी राष्ट्रीय परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डी. राजा,खासदार कॅप्टन अजय यादव,खासदार शामसिंग यादव,माणिकराव ठाकरे,दिलीप मंडल,अरविंद कुमार,मनोज झा,समृद्ध भारतचे पुष्पराज देशपांडे, सुनील सरदार यांच्यासह समृद्ध भारत फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
national obc conclave ओबीसींना पंचायत राज संस्थांमध्ये राजकीय आरक्षण ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्तीने १९९४ साली मिळाले. या राजकीय आरक्षणाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी महात्मा फुले समता परिषदेने तत्कालिन मुख्यमंत्री शरदचंद्र पवारसाहेबांकडे पाठपुरावा केला व पवारसाहेबांनीदेखील महाराष्ट्रात ओबीसींना पंचायत राज संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद लागू केली. मात्र ११ मे, २०१० रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधीशांच्या खंडपीठाने के. कृष्णमुर्ती यांनी निकाल दिला.या निवाडयातील अटींच्या पुर्ततेसाठी ओबीसींची जनसंख्या व सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजणे आवश्यक ठरले. महात्मा फुले समता परिषदेने ताबडतोब २०१० सालीच यावर भूमिका घेतली व ओबीसी जनगणनेची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून ओबीसी जनगणनेवर त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी असे पोलिटीकल लॉबिंग दिल्लीत केले असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. त्यातून या विषयाच्या बाजूने सर्वपक्षीय अशा १०० पेक्षा जास्त खासदारांचा दबाव गट तयार झाला.दिनांक ६ जून,२०१० रोजी नाशिकचे तत्कालिन खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेत या प्रश्नावर चर्चा घडवून आणली होती. या ठरावाला भाजपाचे तत्कालिन उपगटनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी भारतीय जनता पक्षाचे मत विचारात न घेता संसदेत जाहीर पाठींबा दिला तसेच या मागणीला तत्कालिन संसद सदस्य शरद यादव,मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, अजित सिंग, विरप्पा मोईली,वेलूनारायण स्वामी, व्ही. हनुमंतराव आदी दिग्गज नेत्यांनी पाठींबा दिला होता. त्यावेळी याविषयावर तीन दिवस लोकसभा व राज्यसभेचे कामकाज देखील स्थगित झाले होते. तसेच तत्कालिन कृषीमंत्री  शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात ओबीसी जनगणनेचा आग्रह धरला व अखेर तत्कालिन अर्थमंत्री स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांनी ऑगस्ट, २०१० मध्ये लोकसभेत ओबीसी जनगणनेचे आश्वासन दिले. त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

national obc conclave

अनेक प्रयत्नानंतर जनगणनेच्या मागणीवर उल्लेख केल्याप्रमाणे मंजूर झाली. मात्र जनगणना आयुक्तांमार्फत ही जनगणना न करता, केंद्रीय ग्रामीण विकास व नागरी विकास खात्यांनी ओबीसींचा इंपिरिकल डाटा ( सामाजिक-आर्थिक परिस्थितीची माहिती ) जमा केला. हे काम २०११ ते २०१६ याकाळात चालले त्यानंतर २०१४ साली केंद्रात मोदीजींचे व राज्यात फडणवीसांचे सरकार आले. आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावर देखील केंद्राने हा डेटा राज्याला उपलब्ध करुन दिला नाही. केंद्रसरकारने या डेटामध्ये चुका असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली मात्र चुका असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत का अशी विचारणा आम्ही केली मात्र त्यावर केंद्राने काही उत्तर दिले नाही. काल मध्यप्रदेश येथील पंचायत राज मधील आरक्षण गेले आहे. लवकरच कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेशसह देशभरातील पंचायत राज संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द होणार आहे. आज संपुर्ण देश ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या धक्क्याने ग्रस्त आहे. देशभरातील ओबीसींना सामाजिक न्याय व घटनात्मक संरक्षण नाकारून कसे चालेल ? ओबीसींना घटनात्मक आरक्षण दिले तरच ५४ टक्के असलेल्या या वर्गाला न्याय मिळेल असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले.


Tags: chhagan bhujbalOBCobc national conclaveSamrudhi Bharat Foundationओबीसी राष्ट्रीय परिषदछगन भुजबळसमृद्ध भारत फाउंडेशन
Previous Post

“भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे”

Next Post

मुख्यमंत्री ठाकरेंच्या अनुपस्थितीला भाजपानं बनवला मु्द्दा! दुसऱ्यांना पदभार देण्याची सूचना!!

Next Post
cm abscence issue

मुख्यमंत्री ठाकरेंच्या अनुपस्थितीला भाजपानं बनवला मु्द्दा! दुसऱ्यांना पदभार देण्याची सूचना!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!