Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“लोकशाही आहे, खुशाल हायकोर्टात जावं, अधिक उजळ माथ्याने समोर येऊ”: छगन भुजबळ

September 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ असे सांगत महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेलं असतांना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला गेला. नाशिकला आले काय किंवा कुठेही गेले काय, काय झालं? माध्यमांमध्ये किती महत्व मिळालं? असा सवाल त्यांनी उपस्थित करत ‘मेरे खिलाफ होनेवाली बातो को मै अक्सर खामोशी से सूनता हुं, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा है’ अशा शब्दात त्यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर आले असतांना नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात फटाके, ढोल ताशा वाजवत, पेढे वाटून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, समीना मेमन, सुषमा पगारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, महापालिकेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या कविता कर्डक, समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, माजी नगरसेवक हरिष भडांगे, मनोहर कोरडे, संजय खैरनार, मुख्तार शेख, नाना पवार, योगेश कमोद, दिपक वाघ, डॉ.योगेश गोसावी, स्वाती बीडला, महेश भामरे, योगेश निसाळ, शंकर मोकळ, मकरंद सोमंवशी, चिन्मय गाढे, गणेश गायधनी, संदीप गांगुर्डे यांच्यासह यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ते म्हणाले की, आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे. शुभदिनी नाशकात आलोय. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद होणारचं आहे. आमच्यावर कारवाई सुरु असतांना गेल्या ५ वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मन जळत होतं. आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, कार्यकर्त्यांना खाली पाहावं लागेल, याचं दुःख होतं. तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला असल्याचे सांगत असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो, निवडणुकांच्या वेळी थोडं जास्त बोललं जातं. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो. आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडलेत. राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चाललीय. मात्र आता लोक हुशार झाली आहे. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालंय अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले की, केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल. माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व कळतय. जनता सब जानती है. असे सांगत केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. तसेच नाशिक- मराठवाडा पाणी वाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं समन्यायी वाटप आहे. ते त्यानुसार होईल. नाशिक तसेच मराठवाडा कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचबरोबर नाशिकची जलसंपदाची कार्यालयं नाशिकहून कुठेही हलवली जाणार नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Tags: avd anjali damaniachhagan bhujbalMaharashtranashikछगन भुजबळनाशिक- मराठवाडामहाराष्ट्र
Previous Post

‘गामा फाऊंडेशन’ची ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव आरास व सजावट’ स्पर्धा!

Next Post

चित्रा वाघांच्या डोळ्यात अश्रू आणि मुखी अंगार…ठाकरे-पवारांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!!

Next Post
chitra wagh

चित्रा वाघांच्या डोळ्यात अश्रू आणि मुखी अंगार...ठाकरे-पवारांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!