Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

भुजबळांच्या संस्थेने तयार केले २९५ खाटांचे कोरोना सेंटर

April 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणारे वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण असे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोरोना केअर सेंटर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून हे कोरोना केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगर पालिका, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल, नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोरोना केअर सेंटरचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात पार पडले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.

 

chhagan

यावेळी समीर भुजबळ,पंकज भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक डॉ.प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलिप खैरे ,बाळासाहेब कर्डक,आंबदास खैरे, कविता कर्डक, गौरव गोवर्धने, कैलास मुदलियार यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, स्वयंसेवी संस्थानी आजवर तयार केलेले कोरोना सेंटर विलगिकीरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहत आहे. या कोरोना केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

chhagan bhujbal

 

ते म्हणाले की, कोरोनाचे मोठे संकट देशावर आणि राज्यवार असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोरोना सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोरोना सेंटर निर्माण करण्यात यावे असे आवाहन करत राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्था या नाशिकमधील या कोरोना सेंटरची प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगर पालिका, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल,नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

sharad pawar

 

ते म्हणाले की, कोरोनाचे मोठं संकट आपल्यासमोर उभे राहिले असून राज्यातील उद्योजक, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्थांनी कोरोनाच्या लढाईत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिली. तसेच त्यांचे आभार व्यक्त केले.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोरोना केअर सेंटर- माजी खासदार समीर भुजबळ मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोरोना केअर सेंटर आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोरोना सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोरोना केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहत आहे. या कोरोना सेंटर मुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे समीर भुजबळ यांनी सांगितले.

मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था

सदर कोरोना सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून रात्रंदिवस काम करून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा, गुजरात येथून आणण्यात आले आहे. ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर, कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत तर पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे. सर्व बेडवर स्वतंत्र ऑक्सिमिटर आहे.

तज्ञ डॉक्टर, परिचारिका, स्टाफ असणार कार्यरत

सदर कोरोना केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून सर्जन डॉ.अभिनंदन जाधव यांच्यासह ६ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे ११ डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोरोना सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच नाशिक मधील नामांकित फिजिशियन डॉ.शितल गुप्ता आणि डॉ.अतुल वडगांवकर यांचेही सहकार्य लाभणार आहे. रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोरोना सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मिळणार या सुविधा…

  • या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता,फळांचा रस,चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध,शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.
  • त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम इ.खेळ,कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
  • मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल.
  • त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत.
  • जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल.
  • तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

chhagan bhujbal

 

नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या को सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. येथील काही ७०% बेड पुरुषांसाठी तर ३०% बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.


Tags: coronaMinister Chhagan BhujbalNCPncp president sharad pawar
Previous Post

भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये ३२० जागांसाठी भरती

Next Post

सुमित्रा भावे…मानवी भाव-भावना समजून घेत कलात्मक मांडणी…उद्देश सकस समाजनिर्मितीचा!

Next Post
sumitra bhave (5)

सुमित्रा भावे...मानवी भाव-भावना समजून घेत कलात्मक मांडणी...उद्देश सकस समाजनिर्मितीचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!