मुक्तपीठ टीम
आजच्या काळात जवळ जवळ प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. पण एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेकांकडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त मोबाईल नंबर असतात. आज बहुतेक मोबाईल ड्युअल सिमचे आहेत, ज्यामुळे लोक एकाच फोनमध्ये २ सिम वापरतात. त्यात पुन्हा १८ वर्षांखाली मुलांच्या नावावर सिम जारी करता येत नासल्यामुळे प्रत्येक पालक मुलांना स्वतःच्या नावावर सिम देतात. गेल्या काही वर्षांत, भारतात अनधिकृत सिमची वाढती प्रकरणे कार्डधारक आणि सरकारी अधिकारी या दोघांसाठी डोकेदुखी बनली आहेत. त्यामुळे आपल्या नावावर नेमकी किती सिम कार्ड जारी झाली आहेत, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
आता पोर्टलद्वारे तपासा एका फोननंबरवर किती मोबाइल नंबर सक्रिय…
- दूरसंचार विभाग आणि भारत सरकार ने एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in लाँच केले आहे.
- पोर्टल कोणत्याही व्यक्तींना त्यांच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय त्यांच्या नावावर कोण मोबाइल नंबर वापरत असल्याची तपासणी करण्यास परवानगी देते.
- युजर्सना या पोर्टलवर त्यांच्या नावाने जारी केलेले क्रमांक ब्लॉक करण्याची सुविधाही मिळेल.
तुमचा नंबर कसा तपासायचा…
- सर्वप्रथम युजर्स पोर्टलवर लॉग इन करा.
- तुमचा नंबर टाकल्यानंतर प्राप्त झालेला OTP टाका.
- यानंतर DOT त्यांच्या नावावर किती सक्रिय कनेक्शन्स आहेत याची माहिती एसएमएसद्वारे देईल.
- विभाग युजर्सना अलर्ट करेल की जे नंबर युजर्सद्वारे वापरात नाहीत किंवा अनधिकृत आहेत, ते युजर्सच्या विनंतीनुसार ब्लॉक केले जाऊ शकतात.
- या विनंत्यांचा मागोवा घेण्यासाठी विभाग युजर्सना तिकीट आयडी देखील देईल.
एक व्यक्ती किती सिम चालवू शकते?
- सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतातील एका व्यक्तीला फक्त ९ मोबाईल नंबर कनेक्शन दिले जाऊ शकतात.
- ९ पेक्षा जास्त मोबाईल नंबर कोणाला दिले तर ते मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात असेल.
- सरकार या पोर्टलच्या माध्यमातून हा धोका रोखण्यासाठी काम करत आहे.
- eSIM लक्षात घेऊन, सरकारने २०१८ मध्ये केवळ eSIM साठी ही संख्या प्रति व्यक्ती ९ सिमवरून १८ सिमपर्यंत वाढवली आहे.
- eSIM सह, युजर्सला टेलिकॉम कंपनी बदलताना किंवा नवीन कनेक्शन खरेदी करताना देखील सिम बदलण्याची गरज नाही.
- सामान्य सिमच्या विपरीत, eSIM युजर्सच्या डिव्हाइसमध्येच स्थापित केले जाते.
- यामध्ये टेलिकॉम कंपनीचे तपशील अपडेट होतात.
- मोबाइल २ मोबाईल (M2M) संवादासाठी ९ सिम घेतले जाऊ शकतात.