मुक्तपीठ टीम
गेल्या वर्षी मे महिन्यात जॉर्ज फ्लॉयड हत्या प्रकरण अमेरिकतच नाही तर जगात गाजलं होतं. पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांनी फ्लॉईड यांच्या मानगुटीवर गुडघा दाबून त्यांची हत्या केली होती. असा आरोप होता. हा आरोप सिद्ध झाला आहे. न्यायालयाने चौविनला दोषी ठरवले आहे. चौविनला साडे बावीस वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्यासोबत त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे त्यांना ही शिक्षा करण्यात आली, असं न्यायाधीशांनी आदेशात म्हटलं आहे.
फिर्यादींनी ३० वर्षांची शिक्षा मागितल्याचे सांगितले जाते. तथापि, चौविनचे आधीचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यामुळे न्यायाधीशांना १० वर्ष ते १५ वर्षे दरम्यान शिक्षा ठोठावण्याचा सल्ला देण्यात आला.
अमेरिकेतील काळा कुट्ट अध्याय
• २५ मे २०२० रोजी अमेरिकेच्या मिनियापोलिसमधील एका रस्त्यावर ४५ वर्षीय चौविनने फ्लॉईड यांच्या मानेवर गुडघा ठेवून होते. फ्लॉइड यांनी आपला श्वास रोखला जात असल्याचं २० पेक्षा जास्त वेळा चौविन यांना सांगितलं. पण चौविन यांनी त्यांना सोडलं नाही.
• या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अमेरिकेच्या बर्याच भागात ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या बॅनरखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.
• जगभरातील समाज माध्यमांमध्ये ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ हॅशटॅग ट्रेंडिग झाले.
• काही निदर्शनांमध्ये हिंसाचार देखील झाला.
• त्यानंतर अमेरिकेसह जगात इतर ठिकाणीही या घटनेचा निषेध नोंदवत मोठ्या प्रमाणात आंदोलनही झालं होतं.